शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारी रंगांनी न्हाऊन निघणार काळा तलाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 15:25 IST

मंगळवार दिनांक २३ जानेवारी २०१८ रोजी कल्याणच्या इतिहासात नवी नोंद होणार आहे. कल्याण शहरात प्रथमच पाच हजारांहून अधिक विद्यार्थी कल्याणच्या काळा तलावाच्या दुतर्फा आपल्या कुंचल्यातून रंग भरणार आहेत.

कल्याण - मंगळवार दिनांक २३ जानेवारी २०१८ रोजी कल्याणच्या इतिहासात नवी नोंद होणार आहे. कल्याण शहरात प्रथमच पाच हजारांहून अधिक विद्यार्थी कल्याणच्या काळा तलावाच्या दुतर्फा आपल्या कुंचल्यातून रंग भरणार आहेत. निमित्त आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन व भाषाप्रभु राम गणेश गडकरी यांची स्मृतिशताब्दी. कल्याण डोंबिवली महापालिका व राम गणेश गडकरी कट्टा यांच्यातर्फे मंगळवारी २३ तारखेला `महापौर बाल चित्रकला' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कल्याण परिसरातील विविध शाळांतील पाच हजारांहून अधिक विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत सुमारे चार हजार विद्यार्थ्यांची पूर्वनोंदणी झाली आहे. मंगळवारी प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी विद्यार्थी संख्या पाच हजाराहुन अधिक होणार आहे. या बाल चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी सकाळी ८ वाजता महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याहस्ते होणार आहे. स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. स्पर्धेनंतर सर्व विद्यार्थी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत.या स्पर्धेचा बक्षिस समारंभ सायंकाळी ७ वाजता काळा तलाव येथेच होणार आहे. विद्यार्थ्यांना आयोजकांतर्फे बक्षिसे दिली जाणार आहेत शिवाय विविध औद्योगिक संस्थांतर्फे बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे. सायंकाळी काळा तलाव येथे राम गणेश गडकरी कट्ट्याचे उद्घाटन महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याहस्ते होणार आहे. शिवाय सारेगमप मध्ये प्रथम आलेला नचिकेत लेले याचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिका व राम गणेश गडकरी कट्ट्यातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेkalyanकल्याण