शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

ब्लॅक आउटचा होणार टाय टाय फिश? जिल्ह्यात फक्त दोन लाख केबलग्राहक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 04:02 IST

केबल बंद झाले तरी वेगवेगळ्या वाहिन्यांचे अ‍ॅप्स मोबाइलमध्ये डाउनलोड करून किंवा एकाच घरात केबलबरोबर डिश टीव्ही असल्यास त्यावर या मालिका पाहून दर्शक आपले कुतूहल शमवू शकतात. त्यामुळे केबलचालकांच्या ब्लॅक आउटचा ‘टाय टाय फिश’ होण्याची शक्यता आहे.

ठाणे : ‘जुळता जुळता जुळतंय की’मध्ये नायक-नायिकेचे लग्न लागल्यावर पुढं काय होणार किंवा ‘तुला पाहते रे’मध्ये नायिकेचे वडील लग्नाला होकार देणार का, या व अशा ठाण्यातील लक्षावधी दर्शकांच्या मनातील प्रश्नांवर गुरुवारच्या केबलचालकांच्या ब्लॅक आउटचा काहीही परिणाम होणार नाही. केबल बंद झाले तरी वेगवेगळ्या वाहिन्यांचे अ‍ॅप्स मोबाइलमध्ये डाउनलोड करून किंवा एकाच घरात केबलबरोबर डिश टीव्ही असल्यास त्यावर या मालिका पाहून दर्शक आपले कुतूहल शमवू शकतात. त्यामुळे केबलचालकांच्या ब्लॅक आउटचा ‘टाय टाय फिश’ होण्याची शक्यता आहे.ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात असून सरकारी आकडेवारीनुसार संपूर्ण जिल्ह्यात केबलग्राहकांची संख्या एक लाख ४२ हजार आहे. केबलचालक संघटनेच्या दाव्यानुसार ही संख्या दोन लाखांच्या घरात असल्याचे मान्य केले, तरीही बहुतांश दर्शक हे डिश टीव्हीवर किंवा मोबाइलमध्ये वेगवेगळ्या चॅनल्सचे अ‍ॅप डाउनलोड करून किंवा डीटीएच वाहिन्यांचे अ‍ॅप्स डाउनलोड करून या सिरीयल्स पाहत असल्याने घरातील केबलवाहिनी सायंकाळी ७ ते १० बंद राहिली, तरी दर्शकांच्या मनोरंजनात आडकाठी येणार नाही. याखेरीज, या सिरीयल्सचे आदल्या दिवशी झालेले एपिसोड दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवण्याची सोय असल्याने ज्यांनी आपल्या स्मार्ट फोनमध्ये वाहिन्यांचे अ‍ॅप्स डाउनलोड केलेले नाहीत, त्यांना रात्रभर आपली उत्कंठा ताणून धरत शुक्रवारी सकाळी हे एपिसोड पाहता येतील. याखेरीज, समजा एखाद्याला शक्यच झाले नाही, तर यु-ट्युबवर अल्पावधीत हे एपिसोड पाहण्याची सोय आहे. रिलायन्स कंपनीचे जिओ फोन ठाण्यात अनेकांनी घेतले असून त्या फोनचा वापर ते फुकट उपलब्ध असलेल्या नेटच्या माध्यमातून क्रिकेट मॅच किंवा टीव्हीवरील सिरीयल्स, रिअ‍ॅलिटी शो पाहण्याकरिता करतात. ही मंडळी तर हल्ली घरात केबल असले, तरीही मोबाइलवरच मनोरंजन करून घेतात. त्यामुळे केबलवाल्यांचा ब्लॅक आउट अशा जिओ ग्राहकांच्या तर खिजगणतीत नसेल.पसंतीच्या चॅनल्सची निवड अद्याप नाहीवाहिनीनुसार पैसे घेण्याच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमांची अंमलबजावणी येत्या दोन दिवसांत केली जाणार आहे. त्याला विरोध करण्याकरिता केबलचालकांनी ब्लॅक आउटचा निर्णय मंगळवारी झालेल्या केबल आॅपरेटर अ‍ॅण्ड ब्रॉडकास्टर असोसिएशनच्या बैठकीत घेतला. मात्र, असा ब्लॅक आउट निष्फळ ठरण्याचीच शक्यता आहे. मात्र, दोन दिवसांवर निर्णयाची अंमलबजावणी येऊनही अनेक केबलचालकांनी अजून ग्राहकांकडून त्यांच्या पसंतीच्या चॅनलची निवड करून घेतलेली नाही.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनthaneठाणे