ठाणे : ‘लोकमत सखी मंच’ आणि ‘कल्याण महिला मंडळा’च्या उपक्रमाद्वारे सखींसाठी ‘ब्लॅक इज ब्युटीफुल’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाह्यसौंदर्याबरोबरच अंतर्गत सौंदर्य म्हणजेच आपले आरोग्य कसे फिट राहील आणि आपल्याला सर्वार्थाने कसे ब्युटीफुल राहता येईल, याबाबतचा सल्ला ‘आयट्स लाइफ सर्व्हिसेस’तर्फे डॉ. मानसी पंडित यांनी दिला. घरी करता येतील, असे सोपे व्यायामप्रकार त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे दाखवले.आरोग्य आणि स्वच्छता हातात हात घालून येते म्हणूनच होम क्लिनिंग सर्व्हिसेसबाबत ‘आयट्स’च्या शैलेश पत्की यांनी मोलाची माहिती दिली. ‘आयट्स’तर्फे होम क्लिनिंग सर्व्हिसेसची विशेष सवलत सखींसाठी त्यांनी जाहीर केली. ‘आयट्स’तर्फे लकी ड्रॉ काढण्यात आला. वास्तुशास्त्रानुसार वास्तूत बदल केले, तर स्त्रीचे आरोग्य फिट राहू शकते. याविषयी महत्त्वाची माहिती ‘वास्तुरविराज’चे संचालक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तुतज्ज्ञ डॉ. रविराज अहिरराव यांनी दिली.‘कल्याण शहर मंडळा’च्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी ‘लोकमत सखी मंच’च्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सतर्फे लकी ड्रॉ काढण्यात आला. या कार्यक्रमासाठी मंडळाच्या मेघा आघारकर यांचे सहकार्य मिळाले. (प्रतिनिधी)
‘ब्लॅक इज ब्युटीफुल’ सखींनी गाजविले
By admin | Updated: January 24, 2017 05:35 IST