अनुराग ठाकूर यांच्या कल्याण दौऱ्यानिमित्त भाजपाचं शक्तिप्रदर्शन
By अजित मांडके | Updated: February 14, 2023 13:45 IST2023-02-14T13:45:27+5:302023-02-14T13:45:38+5:30
ठाणे : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या कल्याण लोकसभा प्रवासाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने सुद्धा कळवा मुंब्र्यात शक्ती प्रदर्शन ...

अनुराग ठाकूर यांच्या कल्याण दौऱ्यानिमित्त भाजपाचं शक्तिप्रदर्शन
ठाणे :
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या कल्याण लोकसभा प्रवासाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने सुद्धा कळवा मुंब्र्यात शक्ती प्रदर्शन केलं. 2024 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मंत्र्यांचे विविध लोकसभा मतदार संघातील प्रवासाचे कार्यक्रम आखले आहेत.. त्याच अनुषंगाने कल्याण लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा हा दुसरा दौरा आहे.
सध्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार म्हणून निवडून गेले आहेत. आज सकाळी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली.यावेळी भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या जितुद्दीन ला या महाराष्ट्रात थारा नाही त्याच्या विरोधात राग दाखवण्यासाठीच ही प्रचंड गर्दी जमल्याच प्रवीण दरेकर यांनी आपल्या भाषणात म्हटलं. तर 2024 मध्ये सुद्धा विक्रमी मतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा भारताच्या पंतप्रधानपदी निवडून येतील आणि महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पक्षाला विक्रमी जागा मिळतील असा विश्वास केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.कळवा येथे स्वागत झाल्यानंतर ते पुढील प्रवासासाठी कल्याण ग्रामीण लोकसभा मतदारसंघांमध्ये रवाना झालेत..