शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

युतीचा ‘बाजार’ उठला?, भाजपा-राष्ट्रवादीचा समझोता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 00:37 IST

लोकसभेसाठी शिवसेना-भाजपाची युती झाली असली तरी गेली साडेचार वर्षे सातत्याने परस्परांवर दुगाण्या झाडण्यामुळे शिवसेना व भाजपा कार्यकर्त्यांची मने लागलीच जुळली नसल्याची प्रचिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आली आहे.

कल्याण : लोकसभेसाठी शिवसेना-भाजपाची युती झाली असली तरी गेली साडेचार वर्षे सातत्याने परस्परांवर दुगाण्या झाडण्यामुळे शिवसेनाभाजपा कार्यकर्त्यांची मने लागलीच जुळली नसल्याची प्रचिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आली आहे. काही जागांवर शिवसेना भाजपाचे एकमत न झाल्याने भाजपाने शिवसेनेला हुलकावणी देत राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान बांधल्याचा थेट आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या नेत्यांनी अशा प्रकारचा कुठलाही समझोता आमच्यात झाला नसल्याचा दावा केला आहे.बाजार समितीच्या १८ जागांसाठी १३२ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी अंतिम दिवस होता. १३२ जणांपैकी ७७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ५५ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. त्यांना उद्या निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक अधिकारी जाहीर करणार आहेत. १८ जागांपैकी केवळ दोन जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विमुक्त प्रवर्गाच्या आरक्षित असलेल्या जागेवरुन मंगल मस्के तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागेवरुन अरुण जाधव हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे १६ जागांसाठी ५५ उमेदवार रिंगणात आहेत.बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपामध्ये आज दुपारपर्यंत चर्चा सुरु होती. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत भाजपाने शिवसेनेला चर्चेत झुलवत ठेवले आणि सरते शेवटी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याचा आरोप शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केला आहे. त्यामुळे युतीची चर्चा फिस्कटली आहे. शिवसेना बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढवत आहे, असे लांडगे यांनी जाहीर केले.भाजपाचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, शिवसेनेकडून करण्यात आलेला आरोप हा अत्यंत चुकीचा आणि बिनबुडाचा असल्याचा दावा केला. भाजपाने शिवसेनेच्या आरोपाचा इन्कार केला असला, तरी याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी भाजपाशी राष्ट्रवादीची युती झालेली नसल्याचे स्पष्ट केले. अशा प्रकारची युती झाल्यास कळवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भाजपाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.>राष्ट्रवादीशी युती नाही -भाजपाभाजपाचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यासंदर्भात म्हणाले की, बारावेची जागा शिवसेनेने कपिल थळे यांच्यासाठी मागितली होती. अन्यथा शिवसेनेचा उमेदवार अपक्ष निवडणूक लढवणार, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र भाजपाने खडवलीची जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. चार जागा शिवसेने लढवाव्यात तर पाच जागा भाजपा लढवेल हादेखील पर्याय शिवसेनेच्या नेत्यांसमोर ठेवला होता. मात्र हा पर्याय दिल्यानंतर दुपारच्या चर्चेनंतर शिवसेनेनी भाजपाला पाठ दाखवली. शिवसेनेशी चर्चा फिस्कटली हे खरे असले तरी भाजपाने राष्ट्रवादीशी युती केल्याच्या वृत्ताचा चोरगे यांनी इन्कार केला आहे.

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस