अभियंतादिनी भाजपची गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:50 IST2021-09-16T04:50:16+5:302021-09-16T04:50:16+5:30

ठाणे : ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बुधवारी अभियंता दिन साजरा होत असताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी ...

BJP's Gandhigiri on Engineer's Day | अभियंतादिनी भाजपची गांधीगिरी

अभियंतादिनी भाजपची गांधीगिरी

ठाणे : ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बुधवारी अभियंता दिन साजरा होत असताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करीत अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांना गुलाबाचे फूल देऊन अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून लोकांचे प्राण वाचवण्याचे आवाहन केले.

ठाण्यातील घोडबंदर रोडसह इतर रस्ते खड्ड्यांनी गिळंकृत केले आहेत. वाहनचालकांना यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, वाहतूककोंडी, अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. भाजपने या मुद्यावर वेळोवेळी आंदोलन करूनही रस्त्यांची परिस्थिती जैसे थे आहे. खड्ड्यांमुळे निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. ही परिस्थिती बदलल्यास खऱ्या अर्थाने अभियंता दिन साजरा होईल, असा सल्ला आंदोलकांनी दिला. खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे प्राण जात आहेत, याला जवाबदार कोण, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. अभियंता दिन उत्साहात साजरा होत असला तरी, जिल्ह्यात दोनच दिवसांपूर्वी एका लाचखोर शाखा अभियंत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्याचे स्मरण कार्यकर्त्यांनी करून दिले.

..........

Web Title: BJP's Gandhigiri on Engineer's Day