अनधिकृत बांधकामांची भाजपची लक्षवेधी शिवसेनेने गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:52 AM2021-02-20T05:52:24+5:302021-02-20T05:52:24+5:30

ठाणे : दिव्यात झालेल्या अनधिकृत बांधकामांची तक्रार करणाऱ्या भाजपच्या काही मंडळीवर पालिकेने चुकीच्या पद्धतीने एमआरटीपी अंतर्गत कारवाई केल्याचे ...

BJP's eye-catching Shiv Sena rolled out unauthorized constructions | अनधिकृत बांधकामांची भाजपची लक्षवेधी शिवसेनेने गुंडाळली

अनधिकृत बांधकामांची भाजपची लक्षवेधी शिवसेनेने गुंडाळली

Next

ठाणे : दिव्यात झालेल्या अनधिकृत बांधकामांची तक्रार करणाऱ्या भाजपच्या काही मंडळीवर पालिकेने चुकीच्या पद्धतीने एमआरटीपी अंतर्गत कारवाई केल्याचे प्रकरण ताजे असतानाच भाजपच्या नगरसेवकांनी केवळ दिव्यातीलच नव्हे, तर संपूर्ण ठाणे शहरात कोरोना काळात झालेल्या अनधिकृत बांधकामांवरून अतिक्रमण विभागाला घेरण्याची तयारी केली होती. परंतु सत्ताधारी शिवसेनेने लक्षवेधी घेता येणार नसल्याचे सांगत, यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार त्यांनी तो अहवाल सादर केलेला आहे. त्यामुळे यावर चर्चा करू नका, असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांची लक्षवेधी केवळ वाचून गुंडाळण्यात आली.

शहरात कोरोना काळात झालेल्या अनधिकृत बांधकामांसंदर्भात भाजपचे गटनेते संजय वाघुले यांनी दिव्यासह मुंब्रा, कळवा, घोडबंदर, माजिवडा आणि संपूर्ण ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत महासभेत लक्षवेधी मांडली होती. या बांधकामांमुळे महापालिकेच्या पायाभूत सोयीसुविधांवर ताण आल्याचे भाजपने यात नमूद केले आहे. दरम्यान, यापूर्वी झालेल्या महासभेतदेखील महापौरांनी यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. परंतु तो अहवाल अद्याप सादर झालेला नाही. अशातच ठाणे शहरात कोरोनाच्या सावटाखाली अनधिकृत बांधकामे वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अनधिकृत बांधकामांवरून भाजपने प्रशासनाला घेरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु या लक्षवेधीवर अपेक्षेप्रमाणे चर्चा झालीच नाही. ही लक्षवेधी चर्चेला येताच महापौरांनी मागील महासभेत यासंदर्भात काय कारवाई झाली, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने त्याचा अहवाल माझ्याकडे सादर केलेला आहे. त्यामुळे या लक्षवेधीवर चर्चा करू नका, तुम्हालादेखील तो अहवाल दिला जाईल, त्यानंतर यावर चर्चा करा, अशी सूचना त्यांनी केली. त्यानंतर केवळ लक्षवेधीचे वाचन करून लक्षवेधी गुंडाळण्यात आली. एकूणच अनधिकृत बांधकामांच्या निमित्ताने पालिका प्रशासनाला टारगेट करण्याचा भाजपचा प्रयत्न फसल्याचे दिसून आले.

Web Title: BJP's eye-catching Shiv Sena rolled out unauthorized constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.