शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
3
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
4
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
5
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
6
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
7
३ वर्षांपूर्वी बिसनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
9
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
10
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
11
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
12
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
13
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
14
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
15
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
16
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
17
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
18
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
19
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
20
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 

दर कमी केल्यानेही भाजपची गोची, नालेसफाईची निविदा मिनिटात मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 01:36 IST

पावसाळा महिनाभरावर आला असतानाही शनिवारी सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत नालेसफार्ईचे कंत्राट दर जास्त असल्याचे सांगून मंजूर केले नाही.

मीरा रोड  - पावसाळा महिनाभरावर आला असतानाही शनिवारी सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत नालेसफार्ईचे कंत्राट दर जास्त असल्याचे सांगून मंजूर केले नाही. त्यामुळे नालेसफाई बारगळण्याची भीती निर्माण झाल्याने भाजपवर ‘शहर बुडवायला निघाल्या’चा आरोप काँग्रेसने केला. शिवसेनेने या प्रस्तावावर तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे मंगळवारी स्थायी समितीत अवघ्या एका मिनिटात भाजपने निविदा मंजूर करवून घेतली. यावर्षी नालेसफाईचे दर कमी केले असा दावा करणाऱ्या भाजपला गेल्या वर्षी दर जास्त देऊन पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान का केले, असा प्रश्न काँग्रेसने केला.महापालिकेने नालेसफाईच्या कामासाठी ४ मार्च रोजी निविदा काढली असली तरी १० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने निविदा प्रक्रिया बारगळली. मीरा-भार्इंदरसह जिल्ह्यातील अन्य महापालिकांची नालेसफाई ठप्प झाल्याने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे विनंती केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने १ मे रोजी नालेसफाईच्या निविदा मंजुरीचा मार्ग मोकळा केल्याने ४ मे रोजी स्थायी समितीची विशेष बैठक बोलावण्यात आली होती.नालेसफाईकरिता अडीच कोटींची तरतूद आहे. या कामासाठी आलेल्या तीन निविदांपैकी कमी दराची निविदा दाखल केलेल्या ठेकेदारास वाटाघाटीसाठी बोलावून त्याची निविदा मंजूर करण्याता प्रस्ताव आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिला होता. भाजप नगरसेवक धु्रवकिशोर पाटील यांनी प्रस्तावास विरोध करीत ठेकेदाराने दिलेले दर जास्त असल्याचे सांगितले. उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दर जास्त नसून गेल्या वर्षी होते तेवढेच दर असल्याचे स्पष्ट केले.भाजपला निविदा मंजूर करायची नसल्याचे पाहून काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. जानेवारी महिन्यातच महासभेत विषय का मांडला नाही, असा सवाल इनामदार यांनी केला. नालेसफाई लागलीच सुरु झाली नाही तर शहर बुडेल आणि त्याला सत्ताधारी जबाबदार असतील, असा इशारा इनामदार यांनी दिला. त्यामुळे भाजप नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा सोडून आयुक्तांनी पुन्हा ठेकेदाराशी वाटाघाटी करुन आणखी दर कमी करावे, अशी सूचना केली. मंगळवारी पुन्हा स्थायी समितीत विषय आणण्याची सूचना केली. या सर्व खडाजंगीत शिवसेनेचे नगरसेवक तटस्थ राहिले.आयुक्तांंनी ठेकेदाराशी चर्चा करुन दर कमी करुन घेतल्याने मंगळवारच्या सभेत आयुक्तांनी सुधारित दराचा प्रस्ताव दिला. एका मिनिटात तो मंजूर केला गेला. गेल्या वर्षी ध्रुवकिशोर हेच सभापती असताना त्यांनी यंदापेक्षा जास्त दराने नालेसफाईची निविदा कोणाच्या हितासाठी मंजूर केली होती, असा सवाल काँग्रेसने केला.प्रशासनाला आम्ही पुन्हा वाटाघाटी करायला लावून दर आणखी कमी करुन घेतले आहेत. यातून पालिकेचे लाखो रुपये वाचणार आहेत. पण विरोधकांना जनतेच्या पैशांची काळजी नसून ठेकेदाराला महागड्या दराचा ठेका देण्याचा आग्रह धरत आहेत. नालेसफाई वेळेत सुरु होऊन पूर्ण होईल.- ध्रुवकिशोर पाटील,नगरसेवक, भाजपटक्केवारीसाठी भाजपने नालेसफाईच्या कामाची निविदा मंजूर केली नाही. पण शहर बुडाले तर भाजपला विधानसभा निवडणुकीत मोठी अडचण झाली असती. म्हणून आज त्वरित निविदेला मंजुरी दिली. यावर्षी जर गेल्या वर्षीपेक्षा दर कमी झाले आहेत तर गेल्या वर्षी भाजपने काही लाख रुपये जास्त कोणासाठी दिले ? कोणते हित साधले, हे कळले पाहिजे.- जुबेर इनामदार, गटनेता, काँग्रेस

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपा