डोंबिवलीत भाजपची स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:27 IST2021-07-02T04:27:42+5:302021-07-02T04:27:42+5:30

डोंबिवली : डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिन सप्ताहानिमित्त भाजपतर्फे वेगवेगळे समाजपयोगी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक ...

BJP's cleaning campaign in Dombivali | डोंबिवलीत भाजपची स्वच्छता मोहीम

डोंबिवलीत भाजपची स्वच्छता मोहीम

डोंबिवली : डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिन सप्ताहानिमित्त भाजपतर्फे वेगवेगळे समाजपयोगी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी पक्षाच्या डोंबिवली पूर्व मंडलातर्फे माजी नगरसेवक आणि सरचिटणीस मुकुंद पेडणेकर यांच्यातर्फे भाजप महिला आघाडीने स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेची सुरुवात सकाळी ७ वाजता डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरातून करण्यात आली. त्यानंतर डोंबिवली वाहतूक शाखा, रामनगर पोलीस ठाणे, राजाजी पथमार्गे म्हात्रेनगरपर्यंतचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

स्वच्छता मोहिमेचे संयोजक मुकुंद पेडणेकर, अमित देवस्थळी, युवा मोर्चा कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष मिहिर देसाई, डोंबिवली पूर्व मंडलाचे अध्यक्ष मितेश पेणकर यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम पूर्ण झाला. या उपक्रमात डोंबिवली पूर्वचे सर्व पदाधिकारी, भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या अध्यक्षा पूनम पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी उपस्थित होत्या.

------------

Web Title: BJP's cleaning campaign in Dombivali