शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कलानींसाठी भाजपाची धडपड, महापौरपदाचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 03:03 IST

- सदानंद नाईकउल्हासनगर : महापौरपदी भाजपाच्या पंचम कलानी की, शिवसेनासमर्थक साई पक्षाच्या ज्योती भटिजा, याबाबत संभ्रम कायम असून साई पक्षाच्या फुटीर गटातून नगरसेवक शेरी लुंड आणि कांचन लुंड भाजपाच्या डेऱ्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. दुसरीकडे फुटीर गटाचे टोणी सिरवाणी यांनी आपणास विभागीय आयुक्तांनी गटनेतेपदी निवडल्याचा दावा ...

- सदानंद नाईकउल्हासनगर : महापौरपदी भाजपाच्या पंचम कलानी की, शिवसेनासमर्थक साई पक्षाच्या ज्योती भटिजा, याबाबत संभ्रम कायम असून साई पक्षाच्या फुटीर गटातून नगरसेवक शेरी लुंड आणि कांचन लुंड भाजपाच्या डेऱ्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. दुसरीकडे फुटीर गटाचे टोणी सिरवाणी यांनी आपणास विभागीय आयुक्तांनी गटनेतेपदी निवडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांसाठी सिरवाणी आणि इदनानी यांनी दोघांनीही व्हिप जारी केल्याने नगरसेवक संभ्रमित झाले आहेत.उल्हासनगरच्या महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी दुपारी १२ वाजता होत आहे. पंचम कलानी यांनी भाजपाच्या वतीने तर ज्योती भटिजा यांनी शिवसेनेच्या पाठिंब्यावर उमेदवारी दाखल केली आहे. भटिजा साई पक्षाच्या फुटीर गटाच्या नगरसेविका असून विभागीय आयुक्तांनी फुटीर गटाला मान्यता दिल्याचा दावा टोणी सिरवाणी यांनी केला. सिरवाणी यांनी पक्षाच्या १२ नगरसेवकांना भटिजा यांना मतदान करण्याचा व्हिप जारी केला. त्यापूर्वी साई पक्षाचे जीवन इदनानी यांनी गटनेतेपदी आपण असल्याचे सांगून पंचम कलानी यांना मतदान करण्याचा व्हिप नगरसेवकांना बजावला आहे. साई पक्षाचे नगरसेवक या प्रकाराने संभ्रमित झाले आहेत.भाजपा-ओमी टीमचे एकूण ३२ नगरसेवक आहेत. त्यापैकी पूजा भोईर यांचे सदस्यत्व यापूर्वीच रद्द झाले असून नगरसेवक सोनू छापरू यांचे सदस्यत्व जातपडताळणी समितीने रद्द केल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यांचे सदस्यत्व रद्द झाले, तर भाजपा-ओमी टीमच्या नगरसेवकांची संख्या ३० राहणार आहे. साई पक्षाचे ७, राष्ट्रवादी बंडखोर-१, भारिप व काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी १ असे एकूण ४० नगरसेवक भाजपा आघाडीकडे आहेत. बहुमतासाठी ३९ नगरसेवकांची आवश्यकता आहे. साई पक्षाच्या फुटीर गटाच्या उमेदवार ज्योती भटिजा यांच्याकडे शिवसेनेचे २५, रिपाइं-पीआरपी गटाचे ३, साई फुटीर गटाचे ५, राष्ट्रवादीचे ३ असे एकूण ३६ नगरसेवक आहेत. भाजपा आघाडीकडील काँग्रेस व भारिपच्या नगरसेवकांना वरिष्ठांनी भटिजा यांना मतदान करण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे.साई पक्षाच्या कोणत्या गटनेत्याचा व्हिप लागू?साई पक्षात टोणी सिरवाणी व जीवन इदनानी दोघेही स्वत:ला गटनेते असल्याचे सांगत आहेत. दोघांनीही पक्षाच्या १२ नगरसेवकांना व्हिप जारी केला आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी टोणी सिरवानी यांना गटनेतेपदी निवडले असेल, तर त्यांचा व्हिप पक्षाच्या १२ नगरसेवकांना लागू होणार असल्याचे बोलले जात आहे. तसे झाल्यास साई पक्षाच्या फुटीर गटाच्या ज्योती भटिजा महापौर बनण्याची आशा आहे.काँग्रेस, भारिपच्या नगरसेवकांवर दबावआंबेडकरी चळवळीचे प्राबल्य असलेल्या सुभाष टेकडी परिसरातून काँग्रेस पक्षाच्या अंजली साळवे व भारिपच्या कविता बागुल निवडून आल्या आहेत. त्या भाजपासारख्या पक्षाच्या डेºयात दाखल झाल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधून भाजपाच्या पंचम कलानींऐवजी साई पक्षाच्या ज्योती भटिजा यांना मतदान करण्याचे आदेश त्यांना दिल्याची चर्चा आहे.पालकमंत्र्यांकडून खरडपट्टी : साई पक्षाच्या फुटीर गटाच्या एकूण सात नगरसेवकांपैकी शेरी लुंड व कांचन लुंड भाजपाच्या डेºयात दाखल झाले. त्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच त्यांनी शिवसेना व साई पक्षाच्या स्थानिक नेत्यांची खरडपट्टी काढली. या राजकीय घडामोडीमुळे शिवसेनेचे सत्तेचे स्वप्न भंगणार असल्याचेही बोलले जात आहे.उल्हासनगरचा सौदा झालाच नव्हता : सेनेचा दावाउल्हासनगर : कल्याण महापालिकेच्या महापौरपदाच्या मोबदल्यात भाजपाला स्थायी समिती सभापतीपद दिले. उल्हासनगरात भाजपाला मदत करण्याची चर्चाच कधी झाली नाही, असा दावा शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी लोकमतकडे केला. उल्हासनगरच्या महापौर निवडणुकीत शिवसेना साई पक्षासोबत असल्याचे सांगून त्यांनी थेट भाजपाला लक्ष्य केले.साई पक्षामुळे सत्तेला दगाफटका होऊ शकतो, हे ओळखून भाजपाने कल्याण महापालिकेच्या महापौर निवडणुकीत स्वत:च्या वाट्याला आलेले महापौरपद शिवसेनेला दिले आणि त्याबदल्यात उल्हासनगरात मदत करण्याचे आश्वासन शिवसेनेकडून घेतले होते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.भाजपाची सत्ता साई पक्षातील फुटीमुळे संकटात सापडली. शिवसेनेने महापौरपदाचा उमेदवार रिंगणात न उतरवता साई पक्षाच्या मागणीनुसार त्यांना पाठिंबा दिल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली. महापौर निवडणुकीदरम्यान भाजपाने शिवसेनेशी संपर्कच साधला नसल्याने त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे लांडगे म्हणाले.पालिकेला पोलीस छावणीचे स्वरूपनिवडणुकीसाठी पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली १२५ पोलीस, दोन सहायक पोलीस आयुक्त, चार निरीक्षक, ११ पोलीस उपनिरीक्षक, तसेच राज्य राखीव दलासह पोलीस परिमंडळ-४ ची राखीव तुकडी तैनात केले आहेत.सेना युती धर्म पाळतनाही : आमदार पवारकल्याण : उल्हासनगरच्या मोबदल्यात कल्याणच्या महापौरपदावर पाणी सोडणाºया भाजपामध्ये शिवसेनेच्या भूमिकेमुळे असंतोष निर्माण झाला असून सेना युती धर्म पाळत नसल्याचा आरोप भाजपाचे आमदार तथा प्रदेश सचिव आणि उल्हासनगरचे प्रभारी नरेंद्र पवार यांनी केला आहे.कल्याणमध्ये भाजपाची टर्म असतानाही सेनेला महापौरपद देण्यात आले होते. भाजपाने त्यावेळी शब्द पाळला होता. त्यामुळे उल्हासनगर महापौर निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला महापौरपदासाठी पाठिंबा देणे नैतिकदृष्ट्या गरजेचे होते; परंतु साई पक्षाच्या फुटीर गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन शिवसेनेने गद्दारी केली आहे. प्रत्येकवेळेला शिवसेना काही-ना-काही कारण काढून पळवाटा शोधते. केंद्रात आणि राज्यात शिवसेना भाजपासोबत सत्तेमध्ये आहे. परंतु शिवसेनेकडून युतीचा धर्म पाळला जात नाही, असा आरोप नरेंद्र पवार यांनी केला.परिवहन निवडणुकीत गद्दारीभाजपाच्या एका माजी परिवहन सदस्यानेही शिवसेनेच्या भूमिकेवर तोंडसुख घेतले आहे. केडीएमसी परिवहन समितीच्या निवडणुकीत सभापती निवडीच्यावेळीही शिवसेनेने मनसेला पाठिंबा देऊन भाजपाशी गद्दारी केल्याचे स्मरण दिले.भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी १९९0 च्या दशकात ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण’ या मुद्यावरून रान पेटवले होते. त्यामुळेच १९९५ मध्ये युतीची सत्ता आली. त्यावेळी मुंडे यांनी लक्ष्य केलेले पप्पू कलानी यांची सून पंचम हिच्या विजयाकरीता सध्या भाजपाची घालमेल सुरू आहे. शिवसेनेनी साई पक्षात फूट पाडून आपल्या मित्राला खिंडीत पकडले आहे. त्यामुळे भाजपाच्या पाठिंब्यावर पंचम महापौर झाल्याचे कलानी कुटुंबाचे स्वप्न साकार होणार किंवा कसे, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाulhasnagarउल्हासनगर