शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावे निवडणुकीत दाखवणार भाजपाला ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 00:45 IST

केडीएमसीतून २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारला ही गावे निवडणुकीत ठेंगा दाखविणार आहेत.

कल्याण : केडीएमसीतून २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारला ही गावे निवडणुकीत ठेंगा दाखविणार आहेत. भाजपाने खोटी आश्वासने दिली असून, त्याबाबत नागरिकांत जागृती करण्यासाठी १० फेब्रुवारीपासून बॅनर लावणार असल्याचे २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने सांगितले.काँग्रेसने गुरुवारी कल्याणमध्ये सभा घेतली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चमध्ये जाहीर होणार आहे. त्यापूर्वी भाजपाच्या विरोधात लढा उभारला जाणार असल्याची माहिती समितीच्या शिष्टमंडळाने चव्हाण यांना दिली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, पदाधिकारी गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, वंडार पाटील, अर्जुन चौधरी, विजय भाने, शिवराम गायकर, दत्ता वझे, वासुदेव गायकर, अरुण वायले आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपाच्या फसवेगिरीचा पंचनामा १० फेब्रुवारीपासून ठिकठिकाणी बॅनरद्वारे केला जाणार आहे, असे समितीने सांगितले.राष्ट्रवादीचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी गावे वगळण्याचा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला होता. तेव्हा देखील मुख्यमंत्र्यांनी गावे वगळण्यासंदर्भात कोकण भवन आयुक्तांकडे अहवाल प्रलंबित आहे. हा अहवाल येताच गावे वगळण्याचा निर्णय घेऊ असे स्पष्ट केले होेते.

टॅग्स :BJPभाजपाkalyanकल्याण