शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये भाजपाचा 'ढणढणाट'; वाढदिवसाच्या कार्यक्रमात लावली वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 12:04 IST

रेल्वे स्थानकाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात खासदार कपिल पाटील यांची उपस्थिती

बदलापूर : बदलापूररेल्वे स्थानकाचा 162 वा वर्धापन दिन साजरा करताना ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवल्याची बाब समोर आली आहे. उत्साहाच्या नादात रेल्वे प्रवाशांना धोका निर्माण होईल अशी परिस्थिती बदलापूर रेल्वे स्थानकात निर्माण झाली होती.

  बदलापूर रेल्वे स्थानकाचा 162 वा वर्धापन दिन सकाळी नऊ वाजता साजरा करण्यात आला. यावेळी खासदार कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तब्बल दीड तास हा कार्यक्रम रेल्वे स्थानक परिसरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर बदलापुरातील ढोल पथकाला पाचारण करण्यात आले होते. या ढोल पथकाने थेट फलाट क्रमांक 3 वरील तिकीट खिडकी समोरच आपल्या पथकाचे प्रदर्शन दाखविले. यावेळी आवाजाची मर्यादा पूर्णपणे ओलांडली गेली होती. सरासरी 50 ते 55 डेसिबल आवाजाची मर्यादा असताना ढोल पथकामुळे आवाजाची मर्यादा थेट 80 ते 85 डेसिबलपर्यंत गेली होती. ढोल पथक आवाज सुरू असतानाच फलाट क्रमांक तीन वरून डेक्कन एक्सप्रेस गाडी देखील गेली त्या गाडीचा आवाज स्थानकावर प्रवाशांना देखील ऐकू आला नाही. ढोल पथकाचा आवाज एवढा तीव्र होता की एक्सप्रेसचा हॉर्न ऐकू न आल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. उत्साहाच्या भरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात नियमांची पायमल्ली झालेली असताना देखील त्या संदर्भात रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे स्थानक प्रबंधक त्यांच्यामार्फत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. 

आवाजाची मर्यादा ओलांडल्या गेल्या आणि त्या संदर्भातील वृत्त पत्रकार घेत असल्याचे लक्षात येताच स्टेशन मास्तरांनी या ढोल पथकांना आवाज थांबविण्याचे आदेश दिले. पंधरा मिनिटे सुरू असलेल्या या धिंगाण्यात रेल्वे प्रशासन मात्र भाजपच्या कार्यक्रमापुढे झुकल्याचे चित्र निर्माण झाले होते.

  दरम्यान, या कार्यक्रमाच्या आयोजकांनी ढोल पथकाचा कार्यक्रम आपला नसल्याचे स्पष्ट करीत या प्रकरणातून अंग झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

तर ढोल पथकावर गुन्हा दाखल होणार...कार्यक्रमाचा एक भाग म्हणूनच ढोल पथक रेल्वे स्थानकात आलेले असताना देखील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला या प्रकरणातून वाचवण्यासाठी ढोल पथकाच्या कार्यकर्त्यांना पुढे केले आहे. त्यामुळे या ढोल पथकावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे ढोल पथकावर कारवाई करून खासदार पाटील यांना या प्रकरणातून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.

टॅग्स :badlapurबदलापूरrailwayरेल्वेBJPभाजपा