शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
5
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
6
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
7
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
8
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
9
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
10
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
11
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
12
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
13
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
14
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
15
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
16
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
17
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
18
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
19
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
20
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..

भाजपच्या उद्याच्या बैठकीत ठाणे, मुंबईत स्वबळाची चाचपणी? पालिका निवडणुकीवर चर्चेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:35 IST

पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे, मुंबईमध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याच्या दृष्टीने भाजपने चाचपणी सुरू केली असून, त्याच अनुषंगाने ठाण्यात येत्या शुक्रवारी कोकण विभागाची बैठक भाजपने आयोजित केली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या ११ वर्षांच्या विकासकामांवर चर्चा केली जाणार आहे. आगामी पालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या दृष्टीने चर्चा होणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.

 

ठाण्यातील रेमंड येथील भाजपच्या कार्यालयात ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे, गणेश नाईक, रवींद्र चव्हाण आदींसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदींसह कोकण आणि ठाण्यातील १४ जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, १८०हून अधिक मंडळ अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुंबईत भाजपच्या वतीने सर्व्हे करण्यात आला आहे. ठाण्यातही भाजपकडून तशा प्रकारचा सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील भाजपची ताकद लक्षात घेऊन भाजपने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला आहे.

पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू

ठाण्यात भाजपला एकदाही महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करता आलेली नाही. गेली २९ वर्षे ठाण्यावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. २०१७च्या निवडणुकीत भाजपचे ठाण्यात २३ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. त्यामुळेच आता भाजपने आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी स्वबळाचा आग्रह धरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हाध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांमार्फत संपूर्ण कोकणात भाजप जनतेपर्यंत पोहोचून मतदारांचा कौल जाणून घेणार असल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

ही निवडणुकीची बैठक नाही, संघटनात्मक बैठक आहे. बैठकीत संकल्प ते सिद्धी तक या माध्यमातून मागील ११ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती दिली जाणार आहे. ती माहिती जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम पदाधिकारी करणार आहेत.-संदीप लेले, शहर अध्यक्ष, भाजप, ठाणे

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक 2024