शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याची दिल्लीत तुरी, महायुतीमध्ये भाऊगर्दी; लोकसभेचे तिकीट कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 06:38 IST

शिवसेनेचा ठाणे हा बालेकिल्ला असल्याने यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दावा कायम ठेवला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच या दोन्ही पक्षांमध्ये नवे नवे इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. दिल्लीत याबाबत निर्णय होणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीत तिन्ही पक्षांमधील इच्छुकांची संख्या अधिक असणार आहे. त्यावेळी आपली डाळ शिजणार नाही. त्यामुळे थेट लोकसभा निवडणुकीकरिता दावा करायचा व समजा यश मिळाले नाही तरी ज्या विधानसभा मतदारसंघात आपल्याला सर्वाधिक मते मिळतील त्यावर कालांतराने दावा करायचा, अशी रणनीती काहींनी आखली आहे. 

शिवसेनेचा ठाणे हा बालेकिल्ला असल्याने यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दावा कायम ठेवला आहे. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हेच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असणार हे स्पष्ट आहे; परंतु भाजपला हा मतदारसंघ ताब्यात घ्यायचा आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे, तर भिवंडी व ठाणे हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपने ठाणे आणि कल्याणवर दावा केल्यानेच शिवसेनेने ठाणे, कल्याणसह भिवंडी आणि पालघर या मतदारसंघांवर दावा केला. दोन्ही पक्षांकडून मतदारसंघात आपली पाळेमुळे मजबूत करण्यासाठी काम केले जात आहे. 

भाजपमधून माजी खासदार संजीव नाईक व विनय सहस्रबुद्धे तसेच संजय केळकर यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती; परंतु आता या मतदारसंघात मुंबईतून उमेदवार आयात करण्याची रणनीती भाजपने आखल्याचीही चर्चा आहे. शिवसेनेत सुरुवातीला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. आता त्यात ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या नावांची भर पडली. 

मैत्रीचे रूपांतर होणार काँटे की टक्करमध्येराजन विचारे यांचे रवींद्र फाटक हे जुने मित्र मानले जातात; परंतु अशी लढत झाल्यास मैत्रीचे रूपांतर आता ‘काँटे की टक्कर’मध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फाटक यांच्या नावावरून विचारे यांनी त्यांची खिल्ली उडविली आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाShrikant Shindeश्रीकांत शिंदे