शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात घुमला घंटानाद; मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 15:42 IST

भाजपा कार्यकर्त्यांचा शहरातील २८ मंदिरांबाहेर गजर

ठाणे : राज्यातील मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरांसह धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या वतीने आज केलेल्या घंटानादाने ठाणे शहर दुमदुमले. ठाण्यातील प्रमुख देवस्थान कौपिनेश्वर मंदिर परिसराबरोबरच शहराच्या विविध भागातील २८ मंदिरांबाहेर भाजपा कार्यकर्ते, आध्यात्मिक आघाडीसह भाविकांनी `दार उघड उद्धवा दार उघड'च्या घोषणांचा गजर करीत घंटानाद केला.भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील आंदोलनाचे नेतृत्व केले. कौपिनेश्वर मंदिराबाहेरील आंदोलनाला नगरसेवक संदीप लेले, सुनेश जोशी, नम्रता कोळी आदींचीही उपस्थिती होती.केंद्र सरकारच्या निर्देशानंतरही, मंदिरे न उघडता भाविकांच्या भावनांशी खेळ केला जात आहे. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील मंदिरे सरकारने आखून दिलेल्या नियमांत सुरू करण्याची आग्रही मागणी डावलली जात आहे. या मागणीबाबत ठाकरे सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली.महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली गावदेवी माता मंदिरासमोर टाळ वाजवून घंटानाद केला. या वेळी प्रशांत कळंबटे, अमित पेडणेकर, विनय राऊत आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. हिरानंदानी इस्टेट येथील श्री सिद्धीविनायक मंदिराबाहेर नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका कमल चौधरी, सुरेश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी घंटानाद केला. चंदनवाडी येथील सिद्धीविनायक मंदिर व राम मंदिराबाहेर झालेल्या आंदोलनात ज्येष्ठ नगरसेवक अशोक राऊळ, नारायण पवार, भाऊ दामले, संतोष साळुखे, किशोर गुणीजन, रुपेश कारंडे, भरत पडवळ, महेश विनेरकर आदींचा सहभाग होता. लोकपूरम मंदिराबाहेर नगरसेविका मुकेश मोकाशी, स्नेहा आंब्रे, रमेश आंब्रे, संतोष जैस्वाल यांनी आंदोलन केले. ठाणे शहरातील २८ ठिकाणी आंदोलने करण्यात आली. भाजपाच्या नौपाडा मंडल समितीत ५, मध्य मंडल व कळवा मंडल भागात प्रत्येकी ४, घोडबंदर रोड व दिवा भागात प्रत्येकी ३, लोकमान्य नगर, वर्तकनगर व रायलादेवी भागात २, मुंब्रा, कोपरी आणि वागळे इस्टेट भागात एका ठिकाणी टाळांच्या गजराबरोबरच घोषणांमध्ये घंटानाद करण्यात आला.

टॅग्स :BJPभाजपाTempleमंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या