महाविकास आघाडीविराेधात डाेंबिवलीत भाजपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST2021-03-22T04:36:07+5:302021-03-22T04:36:07+5:30
डोंबिवली : मुंबईचे माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबाॅम्बने खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख ...

महाविकास आघाडीविराेधात डाेंबिवलीत भाजपची निदर्शने
डोंबिवली : मुंबईचे माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबाॅम्बने खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० काेटी वसुलीचे टार्गेट दिल्याचे आराेप सिंग यांनी पत्रात केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेउन त्रयस्थ पातळीवरून चाैकशीची मागणी करून रविवारी इंदिरा चाैकात राज्य सरकार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविराेधात निदर्शने करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
परमबीर सिंग हे आयपीएस अधिकारी असून त्यांच्या आराेपांची गंभीर दखल घ्यायला हवी, अशी मागणी भाजपच्या वतीने प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. ठाकरे सरकार हाय हाय, १०० कोटींचा भ्रष्टाचार ही ठाकरे सरकारची मिलीभगत आहे, गली गली में शोर है ठाकरे सरकार चोर है अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पक्षाचे मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, नंदू परब, पूनम पाटील, संजय विचारे, राजेश म्हात्रे, राजन अभाळे, विषू पेडणेकर, खुशबू चौधरी, मंदार हळबे यांच्यासह विविध पदाधिकारी, महिला, पुरुष कार्यकर्ते आदी उपस्थित होते. दरम्यान, परमवीर सिंग या व्यक्तीच्या नव्हे तर ते ज्या पदावर आहेत, त्या पदाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. त्यांना सहकार्य आम्ही करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
------
फोटो आहे