विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात उल्हासनगरात भाजपचे निषेध आंदोलन
By सदानंद नाईक | Updated: January 3, 2023 19:35 IST2023-01-03T19:35:40+5:302023-01-03T19:35:59+5:30
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत असे बोलून महाराजांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ शहर भाजपने आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी मधुबन चौकात निषेध आंदोलन केले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात उल्हासनगरात भाजपचे निषेध आंदोलन
उल्हासनगर : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत असे बोलून महाराजांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ शहर भाजपने आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी मधुबन चौकात निषेध आंदोलन केले. यावेळी पक्षाचे अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामनी, मंगला चांडा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील मधूबन चौकात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत. असे वक्तव्य करून छत्रपती यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी भाजपने निषेध आंदोलन केले. यावेळी आमदार कुमार आयलानी, शहाराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, माजी नगरसेवक महेश सुखरामानी, संघटन मंत्री मनोहर खेमचंदानी, महासचिव मंगला चांडा, अश्विनी मढवी, मनीषा नागरे, अर्चना करणकाळे, मनीषा जाधव, विक्की मेंगवाणी, कमल पंजाबी, राकेश पाठक, चेतना सोनावरिया, विनायकी पाटील, अमृत कोर, स्नेहलता कलशेट्टी, विनिता शिवनांनी यासह जिल्हा पदाधिकारी, माजी नगरसेवक, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, मंडळ, मोर्चा, आघाडी, प्रकोष्ट, सेल व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.