शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात भाजप मैत्रिपूर्ण लढतीच्या तयारीत?

By अजित मांडके | Updated: April 5, 2024 13:36 IST

ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित होत नसताना भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाणे लोकसभा मतदारसंघात ‘शत-प्रतिशत भाजप’चा दावा केल्याने भाजप ठाण्यात शिंदेसेनेबरोबर मैत्रिपूर्ण लढतीच्या मन:स्थितीत आहे का, अशी चर्चा सुरू आहे.

- अजित मांडकेठाणे - ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित होत नसताना भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाणे लोकसभा मतदारसंघात ‘शत-प्रतिशत भाजप’चा दावा केल्याने भाजप ठाण्यात शिंदेसेनेबरोबर मैत्रिपूर्ण लढतीच्या मन:स्थितीत आहे का, अशी चर्चा सुरू आहे. ठाणे लोकसभा भाजपलाच का मिळावा, याची काही महत्त्वाची कारणे भाजप पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली.  त्यामुळे ठाण्यावरून शिंदेसेना व भाजपमधील रस्सीखेच तीव्र होण्याची दाट शक्यता आहे.

ठाणे आणि कल्याणचे उमेदवार अद्याप शिवसेनेकडून जाहीर झालेले नाहीत. ठाणे लोकसभा शिवसेनाच लढणार असल्याचे शिंदेसेनेकडून ठासून सांगितले जाते. परंतु, भाजपकडून हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी दबाव वाढविला जात आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या कळवा, ठाण्यातील फेसबुकवर ‘शत- प्रतिशत भाजप’ अशा पोस्ट गुरुवारी करण्यात आल्या. बुधवारी महायुतीचा संयुक्त मेळावा झाला. त्यामध्ये ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आपले उमेदवार असल्याचा राग महायुतीच्या नेत्यांनी आळवला. लागलीच दुसऱ्याच दिवशी ठाण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी शत-प्रतिशत भाजपचा नारा दिल्याने शिंदेसेना ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडत नसेल, तर शिंदेसेनेच्या विरोधात ठाण्यात मैत्रिपूर्ण लढतीचे संकेत भाजप देत असल्याची चर्चा सुरू झाली. 

भाजपचा दोन जागांसाठी प्रयत्नभाजपची ताकद केवळ ठाणे शहरात नव्हे तर, जिल्ह्यातही वाढत आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपचे १२ आमदार आहेत. त्यात विधानसभेचे ९ आणि विधान परिषदेच्या ३ आमदारांचा समावेश आहे. याशिवाय नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचेच वर्चस्व आहे. ठाण्यातही भाजप कुठेही कमी नसल्याचा दावा भाजपच्या स्थानिक मंडळींकडून केला जात आहे. ठाणे जिल्ह्यात किमान दोन जागा भाजपला मिळाव्यात, असा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यामुळेच भिवंडीनंतर ठाण्यासाठी भाजपच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४thane-pcठाणेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४