भाजपा-ओमी टीम @ ७०

By Admin | Updated: February 9, 2017 04:03 IST2017-02-09T04:03:20+5:302017-02-09T04:03:20+5:30

भाजपा व ओमी कलानी टीमचे ७० जण कमळाच्या चिन्हावर रिंगणात आहेत. ओमी टीमचे ४ जण भाजपा पुरस्कृत अपक्ष म्हणून, तर दोन ठिकाणी

BJP-Omi team @ 70 | भाजपा-ओमी टीम @ ७०

भाजपा-ओमी टीम @ ७०

उल्हासनगर : भाजपा व ओमी कलानी टीमचे ७० जण कमळाच्या चिन्हावर रिंगणात आहेत. ओमी टीमचे ४ जण भाजपा पुरस्कृत अपक्ष म्हणून, तर दोन ठिकाणी कवाडे गटाला पाठिंबा दिला आहे. एका ठिकाणी रिपाइंच्या बंडखोर लता निकम यांच्यासह एका अपक्षाला पुरस्कृत केले.
भाजपा-ओमी टीमचा सिंधी परिसरात, तर शिवसेनेचा मराठी पट्ट्यात बोलबाला असून शहरात तिरंगी लढत होण्याचे संकेत आहेत.
उल्हासनगरच्या इतिहासात प्रथम अनैसर्गिक राजकीय समीकरणे जुळली आहेत. ओमी कलानी टीमला प्रवेश देऊन भाजपाने शहरातील राजकारण बदलून टाकले. शहराने यापूर्वी कलानी विरुद्ध पूर्वीचा जनसंघ, भाजपा व शिवसेना अशी लढत बघितली आहे. कलानी कुटुंबाला राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी व भाजपाला महापालिकेवर महापौर आणायचा असल्याने दोघे एकत्र आले. या अभ्रद्र आघाडीमुळे भाजपाचा चेहरा काळवंडला आहे. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणारा पक्ष म्हणून भाजपाकडे पाहिले जात आहे. पक्ष प्रवेशापूर्वी ओमी कलानी यांच्यावरील गंभीर गुन्हे मागे घेण्याची खेळी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी खेळली आहे.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ओमी टीमला प्रवेश दिल्याने पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांचे राजकीय भविष्य धोक्यात आले. तर, ओमी टीमचे सदस्य भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असून ओमी कलानींचे वर्चस्व वाढण्याचे संकेत राजकीय तज्ज्ञांनी दिले आहेत. ओमी हे नगरसेवक असताना आपली छाप महापालिका महासभेत पाडू शकले नाहीत. त्यांनी मौनी नगरसेवकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. मात्र, त्यांचे पक्ष संघटन चांगले असून त्यांना तीन अपत्यांमुळे निवडणूक लढवता येणार नाही. शहरातील राजकारणात ते किंगमेकरची भूमिका वठवण्याची शक्यता आहे. त्यासाठीच त्यांनी पत्नी पंचम कलानी यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP-Omi team @ 70

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.