भाजपा पदाधिकाऱ्याला नातलगांकडून मारहाण
By Admin | Updated: December 23, 2016 03:00 IST2016-12-23T03:00:45+5:302016-12-23T03:00:45+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि भाजपाच्या पदाधिकारी सुरेखा यशवंत गायकवाड (५२) व त्यांच्या मुलीस

भाजपा पदाधिकाऱ्याला नातलगांकडून मारहाण
मीरारोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि भाजपाच्या पदाधिकारी सुरेखा यशवंत गायकवाड (५२) व त्यांच्या मुलीस सुरेखा यांचे वडील, भाऊ, बहीण, भावोजी, भावजय या नातलगांसह पालिका अधिकाऱ्याने मारहाण केली. तसा गुन्हा मीरारोड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलिसांना मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे.
सुरेखा यांनी अनधिकृत बांधकामे, हातगाडी लावल्याच्या तक्रारी केल्या होत्या. तसेच गावच्या जमिनीचा वाद अशा सर्व प्रकारांमधून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यांचा भाऊ आणि भावजयीने नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. या मारहाणीमागे राजकीय वादंगदेखील कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.
सुरेखा यांच्या दुकानासमोरच त्यांचा भाऊ महेंद्र शिरोळे भिजलेल्या कडधान्याची गाडी लावत असे. त्याची तक्रार त्यांनी महापालिकेत केली होती. शिवाय, महेंद्र यांनी आपल्या राहत्या घरापेक्षा जास्त वाढीव बांधकाम केले आहे. त्याविरोधातील रहिवाशांच्या तक्रारीदेखील गायकवाड यांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कानांवर घालण्याचे आश्वासन दिले होते. गावच्या जमिनीचा हिस्सा मृत भावाच्या मुलांना न दिल्याने सुरेखा आणि त्यांचे वडील किसन शिरोळे यांच्यातही वाद होते. त्यातच भाऊ महेंद्र व त्याची पत्नी तेजस्विनी यांनी महापौर गीता जैन, भाजपा मंडळ अध्यक्ष किरण चेऊलकर आदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
बुधवारी रात्री सुरेखा गायकवाड यामुलगी माधवी (३०) हिच्यासह दुकानाबाहेर बसल्या होत्या. त्याचवेळी त्यांचे वडील किसन शिरोळे (७२), भाऊ महेंद्र शिरोळे, भावजय तेजस्विनी शिरोळे, भाचा रितीक शिरोळे (सर्व रा. चंद्रेश अॅकॉर्ड बि.क्र. १३), बहीण दीपा पोळ, भावोजी अरविंद पोळ, भाची हस्ता पोळ (सर्व रा. सिल्व्हर पार्क) व पालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत पराडकर हे तेथे आले. कौटुंबिक वादातून नातलग आणि पालिका अधिकारी पराडकर यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की करत गायकवाड आणि मुलगी माधवी हिला लाथाबुककयांनी बेदम मारहाण सुरू केली. (प्रतिनिधी )