शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

ठाण्यातील अभियंत्याला मारहाण: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचाही आरोपींंमध्ये समावेश करण्याची भाजपच्या आमदारांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 8:42 PM

ठाण्यातील अभियंत्याला मारहाण प्रकरणामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे उपस्थित असल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये आहे. त्यामुळेच या प्रकरणात आरोपी म्हणून आव्हाड यांच्याही नावाची नोंद करावी. तसेच याप्रकरणी सुरक्षा रक्षक पोलिसांचे निलंबन करुन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी केली आहे.

ठळक मुद्देसंबंधित पोलीस सुरक्षा रक्षकांचेही निलंबन करावेपोलीस उपायुक्तांकडे केली मागणीभाजपचे संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी दिले पत्र

ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ५ एप्रिल रोजी झालेल्या मारहाणीचा प्रकार हा महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेला काळीमा फासणारा आहे. पोलिसांच्या उपस्थितीतच अनंत करमुसे यांना मारहाण झाली. केवळ फेसबुकवर आव्हाडांविरुद्ध कमेंट केल्याने हा प्रकार झाला. करमुसे यांच्या घोडबंदर रोडवरील निवासस्थानी गणवेशातील दोन पोलिसांसह चौघेजण गेले. तिथूनच त्यांना बेकायदेशीरपणे आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले. तिथेच झालेल्या मारहाणीच्या वेळी आव्हाड हे उपस्थित असल्याचा फिर्यादीमध्येही उल्लेख आहे. वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करतांना केवळ एक अनोळखी आरोपी अशी फिर्याद नोंदवली. त्यामुळेच या प्रकरणात आव्हाड यांच्या नावाचीही नोंद करावी. तसेच याप्रकरणी सुरक्षा दलातील पोलिसांचे निलंबन करुन चौकशी करावी. करमुसे आणि आव्हाड यांच्या घराबाहेरील आवाराचे सीसीटीव्ही चित्रण मिळवून चौकशी करावी. तसेच योग्य ती कार्यवाही करावी, असेही या निवेदनात भाजपच्या आमदारांनी म्हटले आहे. दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी मागण्या आणि तक्रारींमुळे हा वाद मात्र चांगलाच चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारी