शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

... अन् अजितदादा शिवसेनेच्या मदतीला धावले, भाजपची हवाच काढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 08:37 IST

काश्मिर फाईल करमुक्त करण्याची मागणी मान्य ही करता येत नाही आणि धुडकाऊनही लावता येत नाही, अशी शिवसेनेची अवस्था.

काश्मिर फाईल हा सिनेमा करमुक्त करण्याची मागणी करत भाजपने मोठा गदारोळ केला. विधिमंडळातही हा मुद्दा भाजप आमदारांनी रेटला. काश्मिरच्या आडून शिवसेनेचे हिंदुत्व पातळं झाल्याचा माहोल तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. हिंदुत्वाच्या विविध मुद्दयांवर सध्या शिवसेनेला कुचंबणा सहन करावी लागत आहे. सुरूवातीच्या काळात आम्ही कडवट हा राग आवळून झाला. पण, आताची ही कडवट मात्र फारशी कामी येईनाशी झाली आहे.

काश्मिर फाईल करमुक्त करण्याची मागणी मान्य ही करता येत नाही आणि धुडकाऊनही लावता येत नाही, अशी शिवसेनेची अवस्था. मात्र, यावेळी अजित पवार यांनी शिवसेनेची ही कोंडी फोडली. खाते त्यांचेच असल्याने या मागणीवर उत्तर देताना रोखठोक अजित पवार यांनी भाजपची चांगलीच फिरकी घेतली. जीएसटीमध्ये राज्याचा व केंद्राचा निम्मा हिस्सा असतो. महाराष्ट्राने करमाफी दिली तरी ती निम्मीच  असणार. त्यामुळे केंद्राने करमाफी दिली तर कन्याकुमारी ते श्रीनगर सगळ्यांना सिनेमा पाहता येईल. त्यामुळे भाजप नेत्यांनी केंद्रात मोदी साहेबांकडे जोर लावावा, म्हणत भाजपची हवाच काढली.

ठाण्यात धुळवडीचा राजकीय रंग वेगळा

ठाण्याच्या टेंभीनाक्यावर स्व. आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या धुळवडीच्या उत्सवात दरवर्षी सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होतात. यामुळे येथील धुळवडीला शहरात वेगळे राजकीय वलय आहे. मात्र. कोरोनाच्या सावटाखाली यंदा दोन वर्षांनंतर साजरा होणार्या येथील धुळवडी उत्सवात तो सर्वपक्षीय आनंद दिसला नाही.  ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून  शिवसेना-राष्ट्रवादीतील वादाचे सावट या या उत्सवावर दिसले. यंदा या उत्सवात फक्त आणि फक्त शिवसैनिकच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाचतांना, रंग उधळतांना दिसले. नेहमी दिसणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते या धुळवडीकडे फिरकले नाही.  मात्र, त्यांनी आपले नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत धुळवडीचा आनंद लुटताना केंद्रीय यंत्रणांविरोधात शिमगा केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाthaneठाणे