शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

भाजप शोधतेय शिवसेनेला जोरदार टक्कर देणारा दबंग गटनेता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 01:12 IST

Thane : सध्या शिवसेनेने शून्य भाजप मोहीम हाती घेऊन भाजपची एकही जागा निवडून येता कामा नये यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळेच शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपनेदेखील कंबर कसली आहे.

ठाणे : येत्या वर्षभरावर ठाणे महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत एकट्याने लढणारा भाजप आता यासाठी कामाला लागला आहे. यानुसार आगामी वर्षभरासाठी शिवसेनेला टक्कर देणारा गटनेत्याचा शोध भाजपच्या श्रेष्ठींनी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये अनेकांची नावे पुढे येत असली तरी जो शिवसेनेच्या कारभाराची पोलखोल करेल, अशा नगरसेवकाच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ घातली जाणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी स्पष्ट केले.सध्या शिवसेनेने शून्य भाजप मोहीम हाती घेऊन भाजपची एकही जागा निवडून येता कामा नये यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळेच शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपनेदेखील कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाचा गटनेता बदलण्याबरोबर स्थायी समितीमध्ये तगडे सदस्य पाठविण्याची तयारी भाजपने केली आहे. सध्या भाजपचे गटनेते संजय वाघुले आहेत. परंतु, त्यांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर आता कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी काहींनी आतापासूनच गुडघ्याला बांशिंग बांधले आहे. या पदासाठी नगरसेवक मिलिंद पाटणकर यांच्यासह नारायण पवार, अशोक राऊळ, मनोहर डुंबरे यांची नावे आघाडीवर आहेत. परंतु, भाजप कोणावर विश्वास टाकणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. नारायण पवार यांना यापूर्वी संधी दिलेली आहे, तर अशोक राऊळ हे पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक असले तरी ते शिवसेनेला कडवी झुंज देतील का? हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता मनोहर डुंबरे आणि मिलिंद पाटणकर यांच्या नावांची चर्चा जोर धरू लागली आहे.मार्च महिन्यात स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणीदेखील भाजपकडून तगडे सदस्य पाठविण्याची तयारी आहे. भाजपचे स्थायी समितीत अवघे तीन सदस्य आहेत, तर १३ सदस्य हे महाविकास आघाडीचे आहेत. 

भारदस्त नावांचा शोधसर्वांना टक्कर देण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेच्या चुकीच्या कामांची पोलखोल करण्यासाठी तीन भारदस्त नावे शोधली जात असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. आता कुणाच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ पडते याकडे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका