शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
3
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
4
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
5
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
6
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
7
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
8
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
9
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
10
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
11
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
12
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
13
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
14
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
15
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
16
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
17
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
18
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
19
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
20
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 10:41 IST

भाजपने शिंदेसेनेच्या सात ते आठ जागांवर दावा केला. शिंदेसेनेने त्याठिकाणी उमेदवार हे कमळावर लढतील असे सांगत जागा न सोडण्याचे संकेत दिले.

 ठाणे :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यात फारसे न दुखावण्याची भूमिका भाजप नेतृत्वाने घेतली असून ५५ जागांची मागणी करणाऱ्या भाजपची ४० जागांवर बोळवण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदेसेना ९१ जागांवर लढणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मित्र पक्षाच्या वाटेला एकही जागा नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.भाजपने ५५ जागांवर दावा केला होता. मात्र, ताे ४५ पर्यंत आला. भाजपने शिंदेसेनेच्या सात ते आठ जागांवर दावा केला. शिंदेसेनेने त्याठिकाणी उमेदवार हे कमळावर लढतील असे सांगत जागा न सोडण्याचे संकेत दिले.

चार जागांवर अद्यापही वादजागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी चार जागांवर अद्याप एकमत झालेले नाही. परंतु त्यावर सोमवारी निर्णय होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारी अर्ज भरण्याची मंगळवारी शेवटची तारीख असल्याने रविवारी, सोमवारी दोन्ही पक्षांकडून ए-बी फॉर्मचे वाटप केले जाणार आहे.शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणारशनिवारी तीन तास दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीत १२ जागांवर घोडे अडले होते, अखेर आता वरिष्ठ पातळीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नव्या समीकरणात मित्र पक्ष रिपाइं किंवा आनंदराज आंबेडकर गटाला कुठेही स्थान देण्यात आलेले नाही. शिंदेसेनेने ८१ ऐवजी ९१ जागा लढविण्यावर एकमत झाले असून भाजपच्या जागा ५५ वरून ४० वर आल्या आहेत. भाजपला हा मोठा फटका मानला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP seemingly yields to Shinde Sena in Thane, contesting fewer seats.

Web Summary : In Thane, BJP appears to have conceded ground to Shinde Sena, agreeing to contest only 40 seats after initially demanding 55. Shinde Sena will contest 91 seats. Discussions continue regarding four contested seats, with a final decision expected soon.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा