शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

"काँग्रेसपेक्षा भाजप सरकारने महाराष्ट्राला अधिक दिले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 06:47 IST

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली/ठाणे : काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने त्यांच्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्राला जेवढी मदत दिली नाही, त्यापेक्षा कित्येक पट अधिक मदत मोदी सरकारने दिली. रेल्वे, रस्ते, मेट्रो प्रकल्प अशा सर्वच विकास कामांकरिता केंद्र सरकार सढळ हस्ते राज्यातील भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सरकारसाठी सहकार्य केल्याचा दावा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील सरकार कोसळण्यासाठी विरोधक देव पाण्यात घालून बसले आहेत. मात्र, त्यांच्या पदरी निराशा येणार असून, हे सरकार आणखी ताकदीने महाराष्ट्राचा विकास करेल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दुसऱ्यांदा दौऱ्यावर मंगळवारी ठाकूर आले. देशाच्या प्रगतीमध्ये मोदी सरकारचे मोठे योगदान असून, मजबूत देशासाठी मोदी यांची पुन्हा गरज असल्याचे ते म्हणाले.

कळवा येथे जोरदार शक्तिप्रदर्शन कल्याण लोकसभा मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप आम्ही एकत्रित अधिक लक्ष देऊन निवडणूक लढू. तसेच यापूर्वी मिळालेल्या यशापेक्षा अधिक मतांनी विजय प्राप्त करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  यावेळी आ. प्रवीण दरेकर, आ. संजय केळकर, आ. गणपत गायकवाड, आ. कुमार आयलानी यांच्यासह जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, सचिव गुलाब करंजुले, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी उपमहापौर राहुल दामले आदी उपस्थित होते. कल्याण लोकसभा प्रवास योजनेच्या द्वितीय पर्वात कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यासाठी ठाकूर यांचे कळवा येथे मंगळवारी सकाळी आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. कळवा येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. 

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरBJPभाजपाcongressकाँग्रेस