भाजपने केले लोकोपयोगी वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST2021-05-31T04:28:50+5:302021-05-31T04:28:50+5:30

डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला रविवारी सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कल्याणमध्ये सुमारे शंभर ठिकाणी सामाजिक ...

BJP distributes public utilities | भाजपने केले लोकोपयोगी वस्तूंचे वाटप

भाजपने केले लोकोपयोगी वस्तूंचे वाटप

डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला रविवारी सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कल्याणमध्ये सुमारे शंभर ठिकाणी सामाजिक कार्यक्रम संपन्न झाले. कोणीही, कुठेही बॅनरबाजी न करता कोरोनाकाळामध्ये सर्वसामान्यांना मदत करणे हेच एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे कार्यक्रम घेण्यात आले.

यामध्ये डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, मोहना टिटवाळा, मलंगगड या सर्व ठिकाणी धान्य, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. काही ठिकाणी अन्नदान करण्यात आले. मास्क वाटप, गरजू कुटुंबांना गरजू वस्तूंचे वाटप प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व येथे आरोग्य शिबिर आयोजित केले होते. खासदार कपिल पाटील यांनी बहुतांश कार्यक्रमांत सहभाग घेतला. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी शेलार चौक येथील वसाहतीमध्ये विशेष कार्यक्रम घेतला. त्यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, प्रदेश सचिव गुलाब करंजुले, तसेच आजी -माजी नगरसेवक, शहराचे अध्यक्ष, पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा या सर्वांनी आपापल्या विभागांमध्ये मदतीचे कार्यक्रम केले.

--------

फोटो आहे

Web Title: BJP distributes public utilities