अंबरनाथमध्ये अंत्यसंस्कारासाठी अतिरिक्त जागा देण्याची भाजपची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:05 IST2021-05-05T05:05:56+5:302021-05-05T05:05:56+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे शहराच्या मध्यभागी असलेली स्मशानभूमी अनेकांना गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे अंबरनाथ पालिकेनं गांडूळ खत ...

अंबरनाथमध्ये अंत्यसंस्कारासाठी अतिरिक्त जागा देण्याची भाजपची मागणी
अंबरनाथ : अंबरनाथ शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे शहराच्या मध्यभागी असलेली स्मशानभूमी अनेकांना गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे अंबरनाथ पालिकेनं गांडूळ खत प्रकल्पाशेजारची पाच एकर जागा ताब्यात घेऊन तिथे हिंदू स्मशानभूमी तसेच मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीयांसाठी दफनभूमी तयार करण्याची मागणी भाजपने केली.
अंबरनाथ आणि बदलापूरच्या मधोमध सर्व्हे क्रमांक १३२ ही पालिकेची जवळपास ३५ एकर जागा आहे. या जागेच्या काही भागात पालिकेचा बंद पडलेला गांडूळ खतप्रकल्प असून, इथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पही उभारला जाणार आहे. या परिसरात नव्याने मोठी लोकवस्ती तयार झाली असून, इथल्या लोकांना अंबरनाथच्या स्मशानभूमीत येणं गैरसोयीचे होते. त्यामुळे गांडूळ खत प्रकल्पाच्या बाजूला असलेली पाच एकर पडीक जागा ताब्यात घ्या आणि तिथे हिंदू स्मशानभूमी, मुस्लीम आणि ख्रिश्चन दफनभूमी तयार करा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष अभिजित गुलाबराव करंजुले-पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी अंबरनाथ पालिकेला पत्र दिले असून, लवकरात लवकर त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली.
----------------------------------------------
वाचली