शर्जील उस्मानीला अटक करण्याची भाजयुमोची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:39 IST2021-03-18T04:39:57+5:302021-03-18T04:39:57+5:30

डोंबिवली : हिंदूंना सडलेले म्हणणाऱ्या शर्जील उस्मानीला त्वरित अटक करा व त्याच्यावर गुन्हा दाखल करा, या मागणीकरिता भाजप युवा ...

BJP demands arrest of Sharjeel Usmani | शर्जील उस्मानीला अटक करण्याची भाजयुमोची मागणी

शर्जील उस्मानीला अटक करण्याची भाजयुमोची मागणी

डोंबिवली : हिंदूंना सडलेले म्हणणाऱ्या शर्जील उस्मानीला त्वरित अटक करा व त्याच्यावर गुन्हा दाखल करा, या मागणीकरिता भाजप युवा मोर्चातर्फे कल्याण तहसीलदारांना बुधवारी निवेदन देण्यात आले.

पुण्यात येऊन उस्मानीने हिंदूंबद्दल अपशब्द वापरले, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी युवा मोर्चा पाठपुरावा करीत असल्याचे भाजयुमोचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी सांगितले. उस्मानीविरुद्ध एफआयआर दाखल केला गेला. परंतु, हा विषय गंभीर असल्याने त्याच्यावर २९५ अ व इतर कलमांखाली गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते. ते करण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे राज्य सरकार उस्मानीला जाणीवपूर्वक पाठीशी घालत असल्याचा आरोप युवा मोर्चा अध्यक्ष मिहीर देसाई यांनी केला. यावेळी

भाजयुमोचे जिल्हा पदाधिकारी स्वप्नील पाटील, अथर्व ताडफळे, राहुल सकपाळ, गौरव देसाई, अन्वेष जोशी, तेजस केम्बारे, अपूर्व कदम, सौरभ सिंग, राणा सिंग, वैभव सावंत, चेतन गिरी उपस्थित होते.

...........

वाचली

Web Title: BJP demands arrest of Sharjeel Usmani