शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीला दे धक्का! अल्पमतात असूनही भाजपाची सरशी; शिवसेना तोंडघशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 06:46 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समिती बळकावली

कल्याण : राज्यातील महाविकास आघाडीच्या पॅटर्ननुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीवर राज्य करण्याचे शिवसेनेचे स्वप्न भाजपने शुक्रवारी धुळीस मिळवले. काँग्रेस आणि मनसेच्या बळावर अल्पमतातील भाजपने सभापतीपद बळकावले. गाफील असलेल्या शिवसेनेवर मात्र बहुमत असूनही तोंडघशी पडण्याची नामुष्की ओढवली.राज्यातील शिवसेना-भाजप युती तुटल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदासाठी शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरले होते. स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे आठ, भाजपचे सहा आणि मनसे तसेच काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून गणेश कोट यांनी तर, त्यांच्याविरोधात भाजपचे विकास म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. शुक्रवारी ऐन निवडणुकीवेळी शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे हे आजारपणामुळे रुग्णालयात दाखल झाल्याने गैरहजर राहिले. त्यामुळे शिवसेनेचे एक मत कमी झाले. मात्र, तरीही राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न कल्याण-डोंबिवलीत राबवून आपलाच विजय होईल, असा ठाम विश्वास शिवसेनेला होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत वेगळेच चित्र दिसले. काँग्रेसच्या हर्षदा भोईर आणि मनसेच्या सरोज भोईर यांनी भाजपला मतदान केल्याने आठ मते मिळवून विकास म्हात्रे सभापतीपदी विराजमान झाले.काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेला मतदान करण्याचे आदेश त्यांच्या सदस्यांस दिले होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच सचिन पोटे आणि त्यांच्या सदस्या हर्षदा भोईर दोघेही निघून गेले. दोघांचेही मोबाइल बंद असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मनसे आणि काँग्रेसने गद्दारी केल्यामुळे पक्षाचा एक सदस्य गैरहजर राहिल्याने आपला पराभव झाल्याचा आरोप शिवसेनेचे गणेश कोट यांनी केला.मनसेबाबत शिवसेना भ्रमातराज्यातील महाविकास आघाडीच्या पॅटर्नप्रमाणे मनसे या निवडणुकीतही तटस्थ राहील, या भ्रमात शिवसेना होती. मात्र, मनसेने भाजपला मतदान करून शिवसेनेला धक्का दिला आहे. विकास म्हात्रे यांचा विजय जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या निवडणुकीत भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निवडणुकीपश्चात शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतून काढता पाय घेतला. पराभवाविषयी काहीही भाष्य न करता, याबाबत पक्षाचे नेतेच बोलतील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा