उल्हासनगरात स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्याकरिता भाजप न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:06 IST2021-05-05T05:06:07+5:302021-05-05T05:06:07+5:30
सदानंद नाईक लोकमत न्यूज लोकमत उल्हासनगर : महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्यासाठी भाजपने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असल्याची ...

उल्हासनगरात स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्याकरिता भाजप न्यायालयात
सदानंद नाईक
लोकमत न्यूज लोकमत
उल्हासनगर : महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्यासाठी भाजपने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी दिली. याबाबत उपायुक्त अशोक नाईकवाडे, महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी यांना माहिती नसल्याचे सांगितले, त्यांनी सांगितले.
उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण पुढे करून, राज्य शासनाने स्थायी समिती सभापतीपदासह अन्य संबंधित निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश काढले. याबाबत शहर भाजपने नाराजी व्यक्त केली. ऑनलाइन सभेत कोरोनाच्या प्रादुर्भावावर भाजपचे पुरस्वानी यांनी सवाल केला. स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत असून शिवसेना आघाडीत असलेला रिपाइं भाजपच्या गोटात सामील झाला. त्यामुळे भाजपची ताकद वाढून समितीच्या १६ पैकी १० सदस्य भाजप आघाडीचे झाले. महापालिकेत भाजपचे बहुमत असून पक्षातील ओमी कलानी समर्थक नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराऐवजी शिवसेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान करून महापौरपदी निवडून आणले आहे.
महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून शेवटच्या वर्षाचे स्थायी समिती सभापतीपद मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. भाजपचे पुरस्वानी यांनी शासनाने काढलेला आदेश रद्द करून स्थायी समिती सभापतींची निवडणूक ऑनलाइन घेण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेनेही स्थायी समिती सभापतीपद राखण्यासाठी राजकीय चाचपणी सुरू केली असून शिवसेना आघाडीकडेच सभापतीपद राहण्याचे संकेत शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिले.
चौकट
रिपाइं भाजप आघाडी सोबत... उपमहापौर भालेराव
महापालिकेत शिवसेना आघाडीसोबत असलेले रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव गेल्या एका महिन्यापासून भाजप गोटात सामील झाले. स्थायी समितीच्या एकूण १६ पैकी भाजपचे ९ तर रिपाइंचा एक सदस्य असल्याने, भाजप-रिपाइंचे एकूण १० सदस्य आहेत. समितीत भाजप-रिपाइंचे स्पष्ट बहुमत असल्याने भाजपकडेच सभापतीपद राहणार असल्याची प्रतिक्रिया भालेराव यांनी दिली.
...........
वाचली