शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या भाजपा नगरसेवकाच्या मुलाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 20:12 IST

परदेशी नागरीकांच्या क्रेडिट कार्ड व गिफ्ट कार्ड आदीची माहिती चोरत त्या रकमेतुन बीटकॉईन खरेदी करत मग भारतिय चलनात वळवुन फसवणूक करणा-या करणा-या ऋषी मदन सिंग (२६) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

 मीरारोड - परदेशी नागरीकांच्या क्रेडिट कार्ड व गिफ्ट कार्ड आदीची माहिती चोरत त्या रकमेतुन बीटकॉईन खरेदी करत मग भारतिय चलनात वळवुन फसवणूक करणा-या करणा-या ऋषी मदन सिंग (२६) या तरुणाला पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्या दिल्लीतील साथदारांचा शोध सुरु असून, अटक आरोपी हा भाजपा नगरसेवक मदन सिंग यांचा मुलगा आहे. या टोळीने लाखोरुपयांचा घोटाळा केल्याची शक्यता असुन पोलीस तपास करत आहेत.सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना माहिती मिळाली की परदेशी नागगरीकांच्या क्रडिट कार्ड, गिफ्टकार्ड आदीचा डेटा चोरुन त्या आधारे मोठ्या प्रमाणात पैशांची फसवणुक केली जात आहे. पोलीसांना खात्री पटताच त्यांनी भार्इंदरच्या जेसल पार्क मध्ये राहणारे भाजपा नगरसेवक तथा प्रभाग समिती सभापती मदन सिंग यांच्या घरावर धाड टाकुन त्यांचा मुलगा ऋषी याला ताब्यात घेतले.पोलीसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्यात व्हॅट्सएप व ईमेल मध्ये परदेशी नागरीकांची क्रेडिटकार्डची माहिती, गिफ्ट कार्ड तसेच छायाछित्र मिळून आली. सदर परदेशी नागरीकांचा हा डेटा आपल्या दिल्ली वरुन पाठवण्यात आल्याचे आरोपीने पोलीसां कडे कबुल केले.या डेटा द्वारे गिफ्ट कार्डचा झीपकोड वापरुन इंटरनेटवरील संकेतस्थळाच्या माध्यमातुन त्याचे मुल्य बीटकॉईन खरेदी केले. त्या नंतर त्या बीटकॉईनचे भारतिय चलनात रुपांतर करुन घेतले. ते पैसे ऋषी हा साथीदारांच्या खात्यावर वळवत असे. यात त्याला कमीशन मिळत होते.आरोपींनी चोरलेला डेटा हा अमेरीकन नागरीकांचा असुन २०१५ पासुन या टोळीने आता पर्यंत लाखो रुपयांना गंडा घातल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलीसांनी आरोपीचे बँक पासबुक आदी ताब्यात घेतले असुन त्यात देखील पैशांचे व्यव्हार झाल्याचे समोर आले आहे. आरोपी ऋषी हा दिल्लीला गेल्या वर्षी गेला होता .गुन्ह्याची व्याप्ती मोठी असुन या प्रकरणी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शना खाली निरीक्षक सुरेश गेंगजे तपास करत आहेत. एकुण किती परदेशी नागरीकांना किती रकमेला गंडवले आहे याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. या फसवणुकीत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक असलेले मदन सिंग यांचा मुलगा आरोपी असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या