शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षप्राधिकरण समितीतील भाजपा सदस्यांच्या राजीनामा नाटयावर अखेर पडदा; बैठक पार पडल्याने राजीनामा मागे घेतल्याचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 18:22 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीची गेल्या अडीच महिन्यांत एकही बैठक पार न पडल्याने नाराज झालेल्या भाजपाच्या १० सदस्यांनी महापौर डिंपल मेहता यांच्याकडे नुकतेच राजीनामे दिले होते.

राजू काळे भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीची गेल्या अडीच महिन्यांत एकही बैठक पार न पडल्याने नाराज झालेल्या भाजपाच्या १० सदस्यांनी महापौर डिंपल मेहता यांच्याकडे नुकतेच राजीनामे दिले होते. अखेर सोमवारी या समितीची बैठक पार पडल्याने भाजपा सदस्यांनी दिलेल्या राजीनामा नाट्यावर अखेर पडदा पडुन त्यांनी आपले राजीनामे मागे घेतल्याचा दावा भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी केला आहे. पालिकेत सत्ताधारी भाजपा व आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यात सुरु असलेल्या शीतयुद्धामुळे सत्ताधारी, प्रशासनाच्या असहाकारामुळे पुरते हैरान झाले आहेत. त्यातच वृक्षप्राधिकरण व उद्यान समिती १६ ऑक्टोबर २०१७ मध्ये गठीत करण्यात आली. या समितीत एकुण १५ सदस्य असुन त्यात सत्ताधारी भाजपाच्या एकुण १० सदस्यांचा समावेश आहे. समिती गठीत झाल्यानंतर त्याची बैठक कमाल ४५ दिवसांच्या अंतराने आयोजित करणे प्रशासनाला नियमानुसार बंधनकार असते. परंतु, गेल्या अडीच महिन्यांपासुन एकही बैठक प्रशासनाकडुन आयोजित करण्यात आली नाही. या समितीचे अध्यक्ष आयुक्त असल्याने प्रामुख्याने भाजपाच्या सदस्यांनी आयुक्तांवर रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली. अशातच ११ जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालिका हद्दीतील पश्चिम महामार्ग क्रमांक ८ च्या रुंदीकरणासाठी सुमारे ६०० झाडांचा बळी दिला जाणार आहे. त्याचा प्रस्ताव रितसर मान्यतेसाठी समितीच्या बैठकीत आणणे आवश्यक असताना एकही बैठक आयुक्तांनी अद्याप आयोजित केली नसल्याने भाजपाच्या सदस्यांनी समितीच्या सदस्यत्वाचे राजीनामे नुकतेच महापौरांकडे सुपुर्द केले होते. वास्तविक राजीनामा द्यायचाच होता तर तो थेट आयुक्तांकडे सुपुर्द करणे अपेक्षित असतानाही भाजपा सदस्यांनी आयुक्तांना लक्ष्य करण्यासाठी दिलेल्या राजीनामा नाट्यावर राजकीय स्टंटबाजीचा आरोप होऊ लागला. त्या सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्यांची कल्पना आयुक्तांना देखील नसल्याचे सांगुन बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. महामार्ग रुंदीकरणासाठी त्यात बाधित होणारी झाडे हटविण्यापुर्वी बैठकीच्या आयोजनाची वाट न पाहताच भाजपा सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्यातील हवा आयुक्तांनी अखेर सोमवारी बैठकीचे आयोजन करुन काढलीच. पक्षाचे वरीष्ठ नेते व मंत्री महामार्गाच्या रुंदीकरणासाठी येणार असल्याचा साक्षात्कार त्या सदस्यांना झाल्याने त्यांनी ती झाडे हटविण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. तत्पुर्वी त्यांनी दिलेले राजीनामे मागे घेत बैठकीत सहभाग घेतल्याचे जिल्हाध्यक्षांकडुन स्पष्ट करण्यात आले.  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक