भाजपा नगरसेविका शिवसेनेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:16 IST2017-08-02T02:16:46+5:302017-08-02T02:16:46+5:30

मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहतां विरुध्द नाराजांची बंडाळी कमी व्हायचे नाव घेत नाही. भार्इंदर पश्चिमेच्या भाजपा नगरसेविका प्रतिभा तांगडे- पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

BJP corporator entry in Shiv Sena | भाजपा नगरसेविका शिवसेनेत प्रवेश

भाजपा नगरसेविका शिवसेनेत प्रवेश

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहतां विरुध्द नाराजांची बंडाळी कमी व्हायचे नाव घेत नाही. भार्इंदर पश्चिमेच्या भाजपा नगरसेविका प्रतिभा तांगडे- पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या मुळे भाजपासोडून शिवसेनेत जाणाºया प्रतिभा चौथ्या नगरसेविका असून भाजपाला आणखी धक्के बसण्याची शक्यता आहे.
प्रतिभा या भार्इंदर पश्चिमेहून २०१२ च्या निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. सध्याचा त्यांचा प्रभाग ७ मध्ये आला असून या ठिकाणी भाजपाने मॉरस रॉड्रिक्स व अ‍ॅड. रवी व्यास यांची उमेदवारी निश्चित केली आहे. तर महिलांमध्ये रोहिणी कदम, दीपाली मोकाशी, एलिना कोळी यांच्यात रस्सीखेच आहे. काही दिवसांपूर्वी पाटील यांच्या विरोधात नाराजी असल्याचे कारण पुढे करून अण्णानगर येथील कार्यक्रमात पाटील व त्यांच्या मुलास धक्काबुक्की, मारहाण करण्यात आली होती.
प्रभाग ७ मधून पाटील यांना उमेदवारी नाकारतानाच सुरूवातील त्यांना प्रभाग ८ मधून उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती. पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात पाटील यांचा पत्ता कापण्यात आला.

Web Title: BJP corporator entry in Shiv Sena