शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

भाजपा नगरसेवकासह कुटुंबास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 3:13 AM

अनाथ पोलीस कन्येला मारहाण केल्याबद्दल भाजपा नगरसेवक दौलत गजरे, त्याची पत्नी कमल व मुलगी आकांक्षा यांना काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे.

मीरा रोड : अनाथ पोलीस कन्येला मारहाण केल्याबद्दल भाजपा नगरसेवक दौलत गजरे, त्याची पत्नी कमल व मुलगी आकांक्षा यांना काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. दसऱ्याच्या दिवशी देवी विसर्जनाच्या वेळी ही घटना घडली होती. सुरुवातीला पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता. मात्र मुलीवरील अन्यायाला सोशल मीडियातून वाचा फुटल्यानंतर शिवसेना, मराठा मोर्चाचे आयोजक आक्रमक झाले होते. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली.मीरारोडच्या सुंदर सरोवर वसाहतीमध्ये सायली राजेंद्र घाग ही लहान भावासह राहते. सायलीचे वडील हे पोलीस दलात होते. तिच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने शेजारच्यांनी सायली व तिच्या भावाचे लहानपणापासून पालनपोषण केले.वसाहतीत दसºयाच्या दिवशी गरबा आयोजित केला होता. त्यावेळी सायली ही मैत्रिणींसह नाचत होती. साडेदहाच्या सुमारास गाणी बंद केली म्हणून सायली व तिच्या मैत्रिणी वाढदिवसाचे राहिलेले गाणे तरी पूर्ण करु द्या, असे सांगू लागल्या. त्यावरुन वसाहतीत राहणारे भाजपाचे प्रभाग १८ चे नगरसेवक गजरे यांच्या पत्नी कमल यांनी सायलीला शिवीगाळ करुन मारहाण केली. गजरे यांची मुलगी आकांक्षा हिने पण मारहाण केली तसेच सायलीच्या गळ््याभोवती दुपट्टा आवळला. सायलीच्या मैत्रिणी व अन्य लोकांनी तिची सुटका केली. त्यानंतर सायली आपल्या मैत्रिणीसह टाक्या धूत असताना कमल व आकांक्षा यांनी पुन्हा मारण्यास सुरवात केली. नगरसेवक गजरे यांनी त्यांना चिथावणी देऊन ‘तुला नग्न करुन मारु’, असे धमकावले. सायलीचे कपडे फाडण्यात आले. पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. घडल्या प्रकाराची सोशल मीडियावर चर्चा झाल्यानंतर मराठा मोर्चाने आक्रमक पावित्रा घेतला. गजरे यांनी अ‍ॅट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला.>खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक यांच्यासह शिवसैनिकांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात जाऊन गजरेला अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी विविध कलमांखाली गजरे, त्याची पत्नी व मुलगी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिली. गजरेने पोलिसांच्या गाडीत बसण्यावरुन शिंगारे यांच्याशी हुज्जतही घातली.

टॅग्स :Arrestअटकmira roadमीरा रोड