शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बीएसयुपी योजनेत भाजप नगरसेविका व तिच्या कुटुंबीयांनी मिळवली २ दुकान व ३ सदनिका

By धीरज परब | Updated: July 13, 2023 20:17 IST

एकाच रेशनकार्ड वर मंजूर केले गेल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे. 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या बीएसयुपी योजनेत नगरसेवक पद व पालिकेतील सत्तेचा गैरपवर करून माजी भाजपा नगरसेविका मीरादेवी यादव व कुटुंबीयांनी २ दुकान आणि ३ सदनिका काही बनावट व खाडाखोड केलेल्या  कागदपत्रांच्या आधारे तसेच एकाच रेशनकार्ड वर मंजूर केले गेल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे. 

काशीमीराच्या जनता नगर झोपडपट्टी परिसरातून मीरादेवी ह्या २००७ साला पासून महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून येत आहेत . २००९ साली जनता नगर झोपडपट्टी साठी महापालिकेने बीएसयुपी योजना अमलात आणल्या नंतर मीरादेवी व त्यांचे पती रामलाल , मुलगा संतोष आणि दीर शामलाल याना दुकाने व सदनिका मंजूर केले गेले आहेत . 

मीरादेवी यांच्या नावाने ९१३ क्रमांकाचे घर असून अर्जात १९९४ सालचा ५ रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर अकबर शेख कडून सदनिका १८ हजारांना खरेदी केली दाखवली आहे . मात्र त्यात मीरादेवी चे नाव खाडाखोड करून रामलालच्या आदी लिहले गेले आहे . १९९१ साली कर आकारणीचा अर्ज मात्र असगर शेख नावाने आहे. 

मीरादेवी यांचे पती रामलाल यांचा ११३२ क्रमांकाचे दुकान नमूद असून त्यात जोडलेला संतोष डेअरी चा गुमास्ता परवाना हा मीरारोडच्या पुनमसागर कॉम्प्लेक्स भागातला असून त्यात खाडाखोड करून तो वापरला आहे . तक्रारी नंतर पालिकेने तो अपात्र ठरवला मात्र परत पात्र ठरवण्यात आला . 

मीरादेवी यांचा मुलगा संतोषच्या नावाने ११६८ क्रमांकाचे घर नमूद आहे . अर्जात दोन स्टॅम्प पेपर वरचे करार असून २००९ च्या करारात आजोबा राजपती कडून ६५ हजारांना खोली खरेदी केल्याचे नमूद आहे. या शिवाय २००५ साली रामलाल व शामलाल यांनी सदर झोपडे मणिलाल यादव कडून विकत घेतल्याचा करार जोडला आहे . 

दीर शामलाल यांच्या नावाने ११३३ क्रमांकाने दुकान व २२८४ क्रमांकाने घर नमूद केले आहे . दुकानासाठी संतोष किराणा स्टोर्स चा गुमास्ता दाखला जोडला आहे . तर घरा साठी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर नोटरी केलेला करारनामा जोडला आहे . करारात सीमा यादव यांनी घर हे शामलाल यांना विनामूल्य हस्तांतरित केले आहे . 

माहिती अधिकारात मिळालेल्या अर्ज निहाय कागदपत्रात , २ गाळे व ३ सदनिका दाखवताना प्र्त्येक अर्जात रेशनकार्ड मात्र एकच ००६८८२३ अनुक्रमांकाचे आहे . मीरादेवी , रामलाल आणि शामलाल यांच्या अर्जासोबत दिलेले वीज बिल देखील एकच असून ते रामलालच्या नावे असलेले खाते क्रमांक १०१६५७२१८ चे आहे . शामलाल यांच्या घर आणि दुकान साठीच्या अर्जासोबत  त्यांच्या नावे असलेला पालिकेचा मालमत्ता क्रमांक एन ०१००१४७९२०० हा एकच आहे . मीरादेवी व संतोष यांच्या नावाने पालिकेत मालमत्ता कर आकारणीच नसल्याचे तसेच शामलाल यांच्या नावाने एन / १२२२ व रामलाल यांच्या नावाने एन / १२२३ अशी कर आकारणी असल्याचा पालिकेचा अहवाल असून एकाच मालमत्तेची विभागणी केल्याचा आरोप होत आहे . 

मीरादेवी यादव ( माजी नगरसेविका , भाजप ) - आपले सासरे १९८० पासून रहात होते . येथील जनतेने मला तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिले असून रामभवन शर्मा हे राजकीय द्वेषाने आमची बदनामी करण्यासाठी खोटे आरोप व खोट्या तक्रारी करतात . महापालिका अधिकाऱ्यांनीसर्व पुरावे - कागदपत्रे यांची सत्यता पडताळूनच सदनिका  पात्र ठरवल्या आहेत . 

रामभवन शर्मा ( उपशहरप्रमुख , शिवसेना शिंदे गट ) -  मीरादेवी यांनी जनतेचा विश्वासघात केला . नगरसेवक पदाचा गैरवापर करून सत्तेच्या बळावर एकसारखेच पुरावे देत पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्यावर दबाव टाकून, काही बनावट व खाडाखोड केलेली कागदपत्रे जोडून २ दुकाने व ३ सदनिका लाटल्या आहेत . महापालिका , शासनची फसवणूक व आर्थिक नुकसान केले आहे . त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक व भादंवि नुसार गुन्हा दाखल करून सदनिका - दुकाने रद्द करावीत .  

शौचालयावर दाखवलेले घर केले रद्द 

सर्वेक्षणात २३९९ हे एकमजली सार्वजनिक शौचालय दाखवलेले आहे . तसे असताना त्या झोपडीक्रमांकाचा अर्ज लाभार्थी म्हणून मीरादेवी यांनी भरला होता . उदयराज यादव कडून ते घर दिड लाखांना खरेदी केल्याचा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरचे करारपत्र जोडले होते. परंतु पालिकेने मीरादेवी यांच्यावर कारवाई न करता त्यांचे दोन घरांसाठी अर्ज आल्याचे कारण नमूद करून २३९९ झोपडी क्रमांकचा अर्ज रद्द ठरवला . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोडBJPभाजपा