भाजपतर्फे शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:53 IST2021-02-20T05:53:44+5:302021-02-20T05:53:44+5:30

डोंबिवली : छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत असून त्यांचे शौर्य, दूरदृष्टी आणि स्वाभिमान, राष्ट्राभिमान, गुरू, माता, पितापूजक ...

BJP celebrates Shiv Jayanti | भाजपतर्फे शिवजयंती साजरी

भाजपतर्फे शिवजयंती साजरी

डोंबिवली : छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत असून त्यांचे शौर्य, दूरदृष्टी आणि स्वाभिमान, राष्ट्राभिमान, गुरू, माता, पितापूजक या गुणांचा प्रत्येक भारतीयाने अभ्यास करावा. मुघल साम्राज्यालाही चारीमुंड्या चीत करून विजिगिषु वृत्ती बाळगणारे महाराज, त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र आदर्श होते. अशा शूरवीर महाराजांना मानाचा सलाम, असे वक्तव्य आ. रवींद्र चव्हाण यांनी केले.

भाजप कल्याण जिल्ह्यातर्फे मानपाडा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पमाला वाहून मानवंदना दिली. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनीही जिल्ह्यात आ. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ५० ठिकाणी महाराजांची जयंती छोटेखानी स्वरूपात साजरी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. उत्साह असला तरीही कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन चव्हाण, कांबळे यांनी ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांना केले. नो मास्क नो शिवजयंती हे सूत्र बाळगून सहभागी झालेल्यांना आवाहन करावे असेही ते म्हणाले.

-----

फोटो आहे

Web Title: BJP celebrates Shiv Jayanti