भाजप उमेदवाराच्या दिरावर प्राणघातक हल्ला

By Admin | Updated: October 29, 2015 23:27 IST2015-10-29T23:27:53+5:302015-10-29T23:27:53+5:30

डोंबिवलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये बुधवारी मध्यरात्री प्रभागात लावलेला बॅनर फाडण्यावरून झालेल्या

BJP attacks on the leader's door | भाजप उमेदवाराच्या दिरावर प्राणघातक हल्ला

भाजप उमेदवाराच्या दिरावर प्राणघातक हल्ला

कल्याण : डोंबिवलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये बुधवारी मध्यरात्री प्रभागात लावलेला बॅनर फाडण्यावरून झालेल्या वादात एका भाजपा महिला उमेदवाराचा दीर रितेश सिंग याच्यावर गाडी घालून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
यात गंभीर जखमी झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी साहील डोंगरा आणि मित्तल आसवाणी या दोघांवर एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यातील एक ाला अटक केली आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या दोन नगरसेवकांची नावे घेतली गेल्याने हा हल्ला शिवसेनेने केल्याचा आरोप भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे.
येथील प्रभाग क्रमांक ३८ च्या भाजप महिला उमेदवाराच्या प्रचार रॅलीनिमित्त प्रभागात बॅनर लावले होते. उमेदवाराचा दीर रितेश आणि त्याचा मित्र विशाल मोरे हे दोघे मोटारसायकलवरून लावलेले बॅनर पाहत होते. त्या वेळी संपर्क कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या गाडीतून दोघे जण उतरले आणि त्यातील एकाने परिसरात लावलेले बॅनर फाडल्याचे निदर्शनास येताच रितेशने विचारणा केली. त्याचा राग येऊन त्या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन अन् बीअरच्या बाटलीने त्यांच्यावर प्रहार करून गाडीतून पलायन केले. (प्रतिनिधी)

Web Title: BJP attacks on the leader's door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.