शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

रस्ते दुरुस्तीची कामे कुचकामी करणाऱ्या बिटकॉनला १० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 22:12 IST

ठाणे  महापालिका हद्दीत रस्त्यांवर पडलेल्या खडय़ांच्या मुद्यावरुन पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवर टिकेची झोड उठविण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : रस्ते दुरुस्तीच्या कामात ढिलाई करणा:या चार कार्यकारी अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असतांनाच आता ठाणो महापालिकेने शहरातील रस्ते दुरु स्तीची कामे करणा:या मे. बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारास पावसाळ्यात रस्ता वाहतूक योग्य न राखल्यामुळे तसेच गुणवत्तापूर्ण काम न केल्याप्रकरणी १० लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिली आहे.

ठाणे  महापालिका हद्दीत रस्त्यांवर पडलेल्या खडय़ांच्या मुद्यावरुन पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवर टिकेची झोड उठविण्यात आली होती. त्यानंतर ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी करुन रस्त्यांची कामे निकृष्ठ करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर त्यांनी दोषी असलेल्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानंतर पालिका आयुक्तांनी महापालिकेच्या चार कार्यकारी अभियंत्यांना निलंबित केले होते. तसेच ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची चौकशी देखील लावण्यात आली होती. त्या अनुषंगाने निविदाकारांना तातडीने कामे करणोबाबत व त्यांचे विरु ध्द कारवाई करणोबाबत बांधकाम विभागाकडून नोटीस बजावण्यात आली होती. परंतु दिलेल्या वेळेत गुणवत्तापूर्ण न केल्याने संबंधित ठेकेदारास तब्बल १० लाख रु पयांचा दंड महापालिका प्रशासनाने ठोठावला आहे.

संबंधित ठेकेदारास कार्यादेशात दिलेल्या भागात पावसाळ्यात रस्त्यातील खड्डे भरु न व तात्पुरती दुरु स्ती करु न रस्ता वाहतुकीयोग्य ठेवणो ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी आहे. संबंधित कार्यकारी अभियंता यांनी वेळोवेळी सुचना देवूनही काम न केल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे दिसून आले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. तसेच या रस्त्यावर केलेले काम काही ठिकाणी काही दिवसातच नादुरु स्त झाले आहे.

ठाणो महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेल्या सुचनेनुसार ठराविक वेळेत, काम पुर्ण केले नसल्याने निविदेतील अटी व शर्तीनुसार दंडात्मक कारवाई करणोबाबत ३ दिवसात खुलासा करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास देण्यात आले होते. तसेच या कामासोबतच ३ दिवसाच्या कालावधीत  कार्यालयाने दिलेल्या सुचनेनुसार नौपाडा कोपरी, उथळसर  व वर्तकनगर प्रभाग समितीमधील देखील खड्डे दुरु स्तीचे काम योग्य गुणवत्ता राखुन काम पुर्ण करून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे आदेशही देण्यात आले होते. परंतु पावसाळ्यात रस्ता वाहतूक योग्य न राखल्यामुळे तसेच दिलेल्या वेळेत गुणवत्तापूर्ण काम न केल्यामुळे मे.बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारास १० लाख रु पयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.