शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ एमआयडीसीतील बिस्कीट कंपनीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 08:51 IST

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कंपन्यांना आगी लागण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कंपन्यांना आगी लागण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अंबरनाथ एमआयडीसीत बिस्कीट कंपनीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान त्यावर नियंत्रण मिळविण्य़ाचे काम करत आहेत. (Fire breaks out at a  factory in the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) area of Ambernath, Thane. )

अंबरनाथ एमआयडीसी भागातील आर. के  बेकवेलमार्क या बिस्किट बनवणाऱ्या कंपनीला पहाटे भीषण आग लागली. सुदैवाने महाशिवरात्रीची सुट्टी असल्या कारणाने कारखाना बंद होता त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.     अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसी मध्ये ही कंपनी असून या कंपनीला पहाटे सहा वाजता अचानक आग लागली. अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण कंपनी या आगीच्या कचाट्यात सापडली. आगीची माहिती मिळताच आनंद नगर एमआयडीसी चे अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. यासोबतच बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर आणि कल्याण सह तळोजा एमआयडीसीतील अग्निशामक गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने कंपनीत सुरक्षा रक्षक वगळता कोणताही कामगार नव्हता. त्यामुळे कोणालाही इजा झालेली नाही. या आगी मागचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

दोन दिवसांपूर्वीच आसनगाव येथील प्लॅस्टिक कंपनीला आग लागली होती. यामध्ये तीन युनीट जळून खाक झाले होते. तर कळवा मनीषानगर येथील सुधाम कृष्णा इमारती मधील मीटर बॉक्सला सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागली होती. यामध्ये त्या इमारतीमधील ३२ मीटर बॉक्स जाळून खाक झाले होते. 

 

हिंगणा एमआयडीसी परिसरात असलेल्या विको कंपनीला रविवारी (दि. 7) रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत प्राणहानी झाली नसली तरी कंपनीचे 70 टक्के नुकसान झाले होते.

टॅग्स :fireआगambernathअंबरनाथ