शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलचे दुकान चालवणारे निघाले दुचाकी चोर; ६ दुचाकी जप्त  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 21:09 IST

मोबाईल दुकान चालवणा-या दोघा भागीदारांना दुचाकी चोरी प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक करुन चोरीच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत.

मीरारोड - मोबाईल दुकान चालवणारया दोघा भागीदारांना दुचाकी चोरी प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक करुन चोरीच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत.शहरातील दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनां मुळे पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमीरा युनिटला गुन्ह्यांचा तपास सोपवला होता. या प्रकरणी भार्इंदर पुर्वेच्या एका दुचाकी चोरी प्रकरणात पोलीसांना सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे आढळुन आले. त्यातील एक चोरटा हा भार्इंदरच्या नवघर मार्ग भागात राहणारा लक्ष्मण जेठाराम सोळंकी ( २६ ) असल्याची माहती पो.ना. संजय शिंदे यांना खबरी मार्फत मिळाली.आरोपीची ओळख पटताच सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक अभिजीत टेलर सह वेळे, वाडिले, पोशीरकर, पंडित, गर्जे, जाधव आदिंच्या पथकाने आधी सोळंकीला अटक केली. त्या नंतर नालासोपारा येथून मुख्य आरोपी पांडु भवानीसिंग राजपुत (२६) याला नालासोपारा येथुन पकडले. २०१६ पासुन दोघे चोरया करत होते. नवघर पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरीचे ५ गुन्हे या दोघांनी केले आहेत.आरोपीं कडुन चोरीच्या ६ दुचाकी जप्त केल्या आहेत. राजपुत व सोळंकी यांचे नालासोपाराच्या तुळींज भागात मोबाईलचे दुकान आहे. राजपुत याने स्वत:ची पल्सर गावी ठेवली होती. त्या गाडीची झेरॉक्स देऊन व नंबर चोरीच्या पल्सर ना लाऊन त्या ३० ते ३५ हजारात विकत असे. दोघांनी चार जणांना चोरीच्या पल्सर विकल्या आहेत.सोळंकी हा रात्रीच्या वेळी भार्इंदर भागात फिरायचा व हँडल लॉक नसलेली पल्सर हेरायचा. राजपुतला बोलवुन मग त्याचा स्वीच काढुन ते गाड्या चोरत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnewsबातम्या