दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:27 IST2021-06-26T04:27:35+5:302021-06-26T04:27:35+5:30

----------------------- पोलिसात तक्रार केली म्हणून मारहाण कल्याण : पूर्वेतील हाजीमलंग रोडवरील गायत्री विद्यालयाच्या परिसरात राहणारे विजयकुमार यादव यांनी दुचाकी ...

Bike theft | दुचाकी चोरी

दुचाकी चोरी

-----------------------

पोलिसात तक्रार केली म्हणून मारहाण

कल्याण : पूर्वेतील हाजीमलंग रोडवरील गायत्री विद्यालयाच्या परिसरात राहणारे विजयकुमार यादव यांनी दुचाकी चोरीप्रकरणी पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून नगऱ्या, रवी अण्णा, जॉन, पऱ्या आदींनी त्यांना लोखंडी पाईप आणि दांडक्याने बेदम मारहाण केली. यादव याचा मित्र क्रिष्णा यालाही चौघांनी मारहाण केली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री १०.३० वाजता राजाराम पाटील नगरमध्ये घडली.

--------------------

दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला मारहाण

डोंबिवली : दारूसाठी पैसे देणे बंद केल्याने पतीने बेदम मारहाण केल्याची तक्रार पुष्पा ओव्हळ यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी पती श्रीकांत विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजता पश्चिमेतील कोपर रोड परिसरात घडली.

--------------------

Web Title: Bike theft