भूमिपुत्रांनी काढला मशाल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:45 IST2021-08-12T04:45:14+5:302021-08-12T04:45:14+5:30

कल्याण : लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास द्यावे, या मागणीसाठी सोमवारी २७ गावांतील संघर्ष ...

Bhumiputras staged a torch march | भूमिपुत्रांनी काढला मशाल मोर्चा

भूमिपुत्रांनी काढला मशाल मोर्चा

कल्याण : लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास द्यावे, या मागणीसाठी सोमवारी २७ गावांतील संघर्ष समितीने मशाल मोर्चा काढला. यावेळी दि. बा. यांचे नाव विमानतळास देण्याबाबत सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास विमानतळाचे काम बंद पाडू, असा इशारा समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी दिला आहे.

क्रांतिदिनाचे औचित्य साधून सोमवारी डोंबिवलीतील मानपाडा येथील मानपाडेश्वर मंदिरात मशाल पेटवून मशाल मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, चंद्रकांत पाटील, अर्जुन चौधरी, गजानन मांगरुळकर, भगवान पाटील, दत्ता वझे, रंगनाथ ठाकूर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. २७ गावे व मंलग पट्ट्यातील गावातून एकाच वेळी हा मशाल मोर्चा काढण्यात आला. दि. बा. यांचे नाव विमानतळास दिल्याशिवाय भूमिपुत्र शांत बसणार नाहीत, असा इशारा यावेळी राज्य सरकारला देण्यात आला.

----------------------

Web Title: Bhumiputras staged a torch march