भोंगळ कारभार! व्हेंटिलेटरअभावी सर्पदंश झालेल्या मजुराचा मृत्यू; भिवंडीतील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 12:18 AM2021-01-30T00:18:05+5:302021-01-30T00:18:19+5:30

रुग्णाला सर्पदंश झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळानंतर रक्तदाब वाढला व त्याला फीट आली

Bhongal Karbhar! Death of a snakebite laborer due to lack of ventilator; Incidents in Bhiwandi | भोंगळ कारभार! व्हेंटिलेटरअभावी सर्पदंश झालेल्या मजुराचा मृत्यू; भिवंडीतील घटना 

भोंगळ कारभार! व्हेंटिलेटरअभावी सर्पदंश झालेल्या मजुराचा मृत्यू; भिवंडीतील घटना 

Next

भिवंडी : येथील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरअभावी सर्पदंश झालेल्या एका आदिवासी मजुराचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. या घटनेने इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा उडालेला बोजवारा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

विठ्ठल देव कोरडा (५५ वर्षे, रा. जव्हार) असे या आदिवासी मजुराचे नाव आहे. ते आपल्या पत्नीसह कारीवली येथील एका बांधकामावर मजुरीचे काम करीत होते. गुरुवारी दुुपारी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी या मजुराच्या पायाला सर्पदंश झाला. येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. या वेळी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी उपचार केले. मात्र त्यानंतर सायंकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी कळवा किंवा मुंबई येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र रुग्णाची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णाची प्रकृती जास्त खालावल्यानंतर रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. हाच सल्ला जेव्हा आम्ही रुग्णाला घेऊन आलो तेव्हाच दिला असता तर आमचा रुग्ण दगावला नसता, असा आरोप या रुग्णासोबत असलेल्या नागरिकांनी डॉक्टरांवर केला. याबाबत उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णावर आवश्यक तेवढे प्राथमिक उपचार करण्यात आले.

इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरची सोय नाही. सर्व व्हेंटिलेटर हे कोविडसाठी वापरण्यात आल्याने तुमच्या रुग्णाला व्हेंटिलेटर उपलब्ध झाला नाही आणि त्या रुग्णाला व्हेंटिलेटरची अत्यंत आवश्यकता होती. त्यासाठी या रुग्णास आम्ही पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला, अशी प्रतिक्रिया येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री डोंगरे यांनी दिली.

रक्तदाब वाढल्याने फीट 
रुग्णाला सर्पदंश झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळानंतर रक्तदाब वाढला व त्याला फीट आली. कदाचित त्याला ब्रेनहॅमरेजसारखा त्रास झाला असावा, ज्यात या रुग्णाचा मृत्यू झाला. व्हेंटिलेटरबद्दल बोलायचे झाले तर नॉनकोविडसाठी व्हेंटिलेटर सुविधा नाही. त्याचबरोबर व्हेंटिलेटर हाताळणारे तज्ज्ञ नाहीत, असे इंदिरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांनी सांगितले.

Web Title: Bhongal Karbhar! Death of a snakebite laborer due to lack of ventilator; Incidents in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.