भिवंडी दोन सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:37 IST2021-04-03T04:37:31+5:302021-04-03T04:37:31+5:30
भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढला असून, शुक्रवारी शहरात ११२ तर ग्रामीण भागात ३५ अशा तब्बल १४७ ...

भिवंडी दोन सारांश बातम्या
भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढला असून, शुक्रवारी शहरात ११२ तर ग्रामीण भागात ३५ अशा तब्बल १४७ रुग्णांची नोंद झाली. भिवंडीत मागील दोन महिन्यांपासून कोरोना आटोक्यात होता. मात्र मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करावे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
======================================================
भिवंडी महापालिकेत नागरिकांना प्रवेश बंद
भिवंडी : कोरोनाचा धोका वाढत असल्याने शहरातील नागरिकांसाठी महापालिकेच्या मुख्य कार्यालयात पुढील आदेश होईपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी गुरुवारी याबाबतचे लेखी आदेश दिले. नागरिकांनी ई-मेलद्वारे आपल्या समस्या मनपा प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले असून, सात दिवसांच्या आत नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिले आहेत.
..........
वाचली.