काम बंद आंदोलनामुळे भिवंडी तहसील कार्यालयात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 16:37 IST2022-02-23T16:37:33+5:302022-02-23T16:37:40+5:30

आंदोलनाची माहिती नसलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात येऊन काम न होताच परत माघारी फिरायला लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसली.

Bhiwandi tehsil office suffocated due to strike | काम बंद आंदोलनामुळे भिवंडी तहसील कार्यालयात शुकशुकाट

काम बंद आंदोलनामुळे भिवंडी तहसील कार्यालयात शुकशुकाट

-नितिन पंडीत

भिवंडी- शासकीय सभेतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी दोन दिवसीय काम बंद आंदोलन पुकारला आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे नेहमीच वर्दळ असलेल्या भिवंडी तहसील कार्यालयाच्या परिसरात बुधवारी शुकशुकाट दिसला. विशेष म्हणजे या आंदोलनाची माहिती नसलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात येऊन काम न होताच परत माघारी फिरायला लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसली.

Web Title: Bhiwandi tehsil office suffocated due to strike