Bhiwandi taluka at the mouth of the volcano | भिवंडी तालुका ज्वालामुखीच्या तोंडावर

भिवंडी तालुका ज्वालामुखीच्या तोंडावर

भिवंडी : भिवंडी तालुका जणू काही ज्वालामुखीचा तालुका ठरू पाहत आहे. तालुक्यात आगीचे सत्र सुरू असून, सोमवार व मंगळवारी आगीच्या चार घटना घडल्या असतानाच बुधवारी दुपारच्या सुमाराला पुन्हा मेणबत्तीसह धूप साठवून ठेवलेल्या गोदामाला भीषण आग लागली. ही घटना तालुक्यातील वळ ग्रामपंचायतीच्या वळपाडा येथील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील गोदामात घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होऊन दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. यात लाखोंच्या मेणबत्ती व धूपाचा साठा जळून खाक झाला.

धूप व मेणबत्तीचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने आगीने त्वरित पेट घेतला. काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. यामुळे गोदामाजवळ असलेल्या इतर गोदामांनाही आगीची झळ पोहचण्याआधीच स्थानिक पंचायत समिती सदस्य विकास भोईर यांनी खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करत कामगारांच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा केला. ही आग इतर गोदामापर्यंत पोहचू न देण्याचा प्रयत्न केल्याने इतर गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचविण्यात यश आल्याने आर्थिक नुकसान टळले. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद केली आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळावर आली. मी स्वतः गावातील आठ ते दहा पाण्याचे टँकर मागवून या आगीवर नियंत्रण मिळवले. जर स्थानिक टँकर मिळाले नसते तर आज मोठा अनर्थ झाला असता, अशी प्रतिक्रिया भिवंडी पंचायत समितीचे सदस्य विकास भोईर यांनी दिली.

------------------------

फोटो ओळ : भिवंडी तालुक्यातील गोदाम, धूपाच्या गोदामाला लागलेली आग.

===Photopath===

030321\videocapture_20210303-152317.jpg

===Caption===

भिवंडी तालुक्यात अग्नितांडव सुरूच : मेणबत्तीसह लोबानच्या गोदामाला भीषण आग ..

Web Title: Bhiwandi taluka at the mouth of the volcano

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.