शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी एस टी कामगारांचा वाद पोलीस ठाण्यात, स्थानकाबाहेर पोलीस बंदोवस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 14:21 IST

भिवंडी : वेतनवाढीसह आपल्या इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक अघोषित संप पुकारल्याने शहरातील प्रवासी नागरिक व नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल झाले.भिवंडी आगारातील काही कर्मचा-यांनी संपाला पाठिंबा न दिल्याने उद््भवलेला वाद निजामपूर पोलीस ठाण्यात गेला.याची नोंद घेत पोलीसांनी स्थानकांमध्ये कडक पोलीस बंदोवस्त लावला आहे.एसटी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करावा,पदनिहाय वेतनश्रेणी ...

ठळक मुद्देबसेस सुरू करण्याबाबत दोन संघटनेच्या कामगारांमध्ये वादसंप काळात आगारप्रमुखाने पोलीस बंदोवस्तात सोडल्या बसेसआगारात बसेस बंदअसताना शिवसेना संघटनेचा संप अयशस्वी झाल्याचा दावा

भिवंडी : वेतनवाढीसह आपल्या इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक अघोषित संप पुकारल्याने शहरातील प्रवासी नागरिक व नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल झाले.भिवंडी आगारातील काही कर्मचा-यांनी संपाला पाठिंबा न दिल्याने उद््भवलेला वाद निजामपूर पोलीस ठाण्यात गेला.याची नोंद घेत पोलीसांनी स्थानकांमध्ये कडक पोलीस बंदोवस्त लावला आहे.एसटी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करावा,पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी,जोपर्यंत कामगार, कर्मचाºयांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचारी, कामगारांना २५ टक्के हंगामी वाढ देण्यात यावी,अशा विविध मागण्यासाठी कामगार संघटनांनी शहरातील भिवंडी आगारात आज पहाटेपासून संपाला सुरूवात झाली. राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलेली वेतनवाढ करार हा फसवा असल्याची माहिती एस.टी कामगारांनी दिली.त्यामुळे हा संप अघोषित असल्याने भिवंडी एस.टी.आगारातील कर्मचा-यांमध्ये संपाबद्दल संभ्रम निर्माण झाला त्यामुळे दोन कामगार संघटनेच्या सदस्यांचा वाद झाला. भिवंडी आगारात एकूण पाच कामगार संघटना असून महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना व महाराष्ट्र एस.टी. वर्कस् काँग्रेस(इंटक)या संपामध्ये सहभागी होत्या तर शिवसेना,कास्टट्राईब व मनसे या तीन संघटनांनी या संपाला विरोध दर्शविला होता. ४५४ पैकी केवळ ६३ कर्मचारी कामावर हजर असल्याने आजचा संप यशस्वी ठरल्याची माहिती कर्मचाºयांनी दिली. प्रवास्यांचे हाल होऊ नये म्हणून आगार प्रमुख एस.पी.डूंबरे यांनी पोलीस बंदोवस्तात कल्याण,ठाणे,वाडा या ठिकाणी बसेस सोडल्या. तसेच बाहेरून आलेल्या बसेस देखील आगारात येऊन जात होत्या.मात्र कोणताही अनुचीत प्रकार घडली नाही.दरम्यान भिवंडी आगारातील महाराष्ट्र कामगार संघटनेचा सदस्य जी.बी.इंगळे व व्हि.जी.आव्हाड यांच्यामध्ये बसेस आगाराबाहेर काढण्यावरून शिवीगाळ व बाचाबाची झाल्याने इंगळे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात जाऊन आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलीसांनी या बाबत नोंद घेऊन दोघांनाही समज दिली.याच वेळी भिवंडी आगारात बसेस उभ्या असताना शिवसेना प्रणीत संघटनेच्या पदाधिकाºयांनी संप अयशस्वी जाल्याचा दावा केला.या संपाचा फायदा घेत शहरातील काही रिक्षाचालकांनी ठाणे व कल्याण येथे जाण्यासाठी प्रवाश्यांची वाढीव भाडे मागून लूट केली. त्यामुळे प्रवाश्यांनी तिव्र संताप व्यक्त केला.

टॅग्स :BhiwandiभिवंडीST Strikeएसटी संप