भिवंडीत एस टी कर्मचाऱ्यांनी घातले शासनाचे तेरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 18:27 IST2021-11-19T18:27:32+5:302021-11-19T18:27:55+5:30

एस टी महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासह आपल्या प्रमुख मागण्यासाठी एस टी कामगारांच्या संपला आज तेरा दिवस पूर्ण झाले असून अजून ही कामगार आपल्या मागण्यांसह आंदोलनावर ठाम आहेत.

In Bhiwandi, ST employees put on the government's thirteenth | भिवंडीत एस टी कर्मचाऱ्यांनी घातले शासनाचे तेरावे

भिवंडीत एस टी कर्मचाऱ्यांनी घातले शासनाचे तेरावे

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. १९ )  एस टी महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासह आपल्या प्रमुख मागण्यासाठी एस टी कामगारांच्या संपला आज तेरा दिवस पूर्ण झाले असून अजून ही कामगार आपल्या मागण्यांसह आंदोलनावर ठाम आहेत. आज राज्यात एस टी कामगार विविध पद्धतीने आंदोलन करीत असताना तुटपुंज्या वेतना मुळे सुरू असलेल्या आंदोलनात आता पर्यंत ३८ एस टी कामगारांचा बळी गेला असून त्या नंतर ही शासनास जाग येत नसल्याने शुक्रवारी भिवंडी एस टी आगारात कामगारांनी सरकारचे तेरावे घालीत आंदोलन केले .या आंदोलनात अनेक चालक वाहक कर्मचारी सहभागी झाले होते. 

Web Title: In Bhiwandi, ST employees put on the government's thirteenth