भिवंडी पं.स. सदस्याचा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:52 IST2017-08-02T01:52:57+5:302017-08-02T01:52:57+5:30

अंबाडी ग्रामपंचायतीच्या दांडीबहाद्दर ग्रामविकास अधिकाºयांनी पंचायतीत केलेल्या सावळ्या गोंधळाची माहिती देऊनही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणारे

Bhiwandi pps Demonstration prompt for member | भिवंडी पं.स. सदस्याचा उपोषणाचा इशारा

भिवंडी पं.स. सदस्याचा उपोषणाचा इशारा

अनगाव : अंबाडी ग्रामपंचायतीच्या दांडीबहाद्दर ग्रामविकास अधिकाºयांनी पंचायतीत केलेल्या सावळ्या गोंधळाची माहिती देऊनही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणारे भिवंडी पं.स.चे विस्तार अधिकारी इंद्रजित काळे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, याकरिता पंचायत समितीचे माजी सदस्य विकास जाधव यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिला आहे.
अंबाडी ग्रा.पं.चे ग्रामविकास अधिकारी सतत गैरहजर राहणे, खरेदी केलेल्या वस्तूंचे कोटेशन न घेताच खरेदी करणे, खर्चाच्या नोंदी न करणे, पंचायतीच्या मासिक सभेचा मी अध्यक्ष असतानाही माझ्या सह्या न घेता गैरहजर सदस्यांच्या निवासस्थानी जाऊन सह्या घेणे, या ग्रामविकास अधिकाºयाच्या कारभाराची कागदपत्रांसह माहिती विस्तार अधिकाºयांना देऊनही त्यांनी संबंधित ग्रामविकास अधिकारी नारायण जाधव यांच्यावर कारवाईस टाळाटाळ केल्याने त्यांच्याविरोधात फेब्रुवारीमध्ये तक्र ार केली. त्यावर, मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून कुठलीच दखल न घेतल्याने १३ जुलैला स्मरणपत्र दिले.

Web Title: Bhiwandi pps Demonstration prompt for member