शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत अल्पवयीन चिमुरडी सोबत कुकर्म करून हत्या; नराधमास पोलिसांनी केली अटक

By नितीन पंडित | Updated: July 5, 2024 15:18 IST

भिवंडीत चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून आरोपीने हत्या केली होती

भिवंडी: शांतीनगर भागातील गोविंद नगर परिसरात एका इमारतीमध्ये नऊ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून हत्या करणाऱ्या नराधम आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेने रात्री उशिरा अटक केली आहे. त्यानंतर आरोपीचा ताबा शांतीनगर पोलिसांकडे सुपूर्द केला आहे.

अभय यादव असे या नराधम कुकर्म करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास कामावरून घरी परतलेल्या कुटुंबियांना आपली नऊ वर्षाची मुलगी घरात आढळून न आल्याने तिचा परिसरात शोध  घेत असता त्याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका बाहेरून कडी लावलेल्या खोलीत तिचा गळा होऊन हत्या केलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.या घटने नंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.शांतीनगर पोलिसांसोबतच भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस पथकांनी परिसरातील नागरिकांकडून माहिती घेत आरोपीचा शोध सुरू केला असताना रात्री उशिरा आरोपी हा एका ठिकाणी लपून बसलेल्या अवस्थेत गुन्हे शाखेला आढळून आला.

गुन्हे शाखेने आरोपीस पहाटे उशिरा शांतीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.शांतीनगर पोलिसांनी आरोपी अभय यादव याच्या विरोधात बलात्कार व हत्या या कायद्याने गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस